मुंबई : (Asha Bhosle) भारतीय संगीतविश्वाचा चिरतरुण आवाज अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी रविवार दि. १२ एप्रिल रोजी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना शनिवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या दि. १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
८ सप्टेंबर १९३३ साली सांगलीला आशाताईंचा जन्म झाला. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी गायनाला सुरुवात केली. हजार पेक्षा जास्त चित्रपटांसाठी, आशाताईंनी वीसहून अधिक भाषांमध्ये गाणी गायली होती. चित्रपटाबरोबरच, शास्त्रीय संगीत, भजन, लोककला, कव्वाली, गझल, गुरुबानी अशा अनेक गीतप्रकारांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला.
माझ्या जगण्यातील श्रीमंती आज मी गमावली ! : आशिष शेलार
आशाताईंच्या निधनावर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले की भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या... जय शारदे.. वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या... कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपट गीत ही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या... भाषेची बंधने तोडून २० पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या... स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या... आणि भाऊबीजेला "सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती..." अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या.माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली... साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही...माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली."
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.