Raj Thackeray on Ashok Kharat Case:‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र...?’; अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Total Views |


 
Raj Thackeray on Ashok Kharat Case
 
मुंबई: (Raj Thackeray on Ashok Kharat Case) सध्या राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने आता मोठं राजकीय वादळ निर्माण केलं आहे. या प्रकरणातील धक्कादायक तपशील समोर येत असताना राज ठाकरे यांनी राजकारणी आणि अधिकाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. सोशल मीडियावर लिहिलेल्या आपल्या सविस्तर पोस्टमध्ये त्यांनी या प्रकरणावर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Raj Thackeray on Ashok Kharat Case)
 
 
पोस्टमध्ये नेमकं काय?
 
सोशल मीडियावर लिहिलेल्या आपल्या सविस्तर पोस्टमध्ये त्यांनी या प्रकरणातील “हिडीस” तपशील वाचून धक्का बसल्याचं सांगत, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक अधःपतनावर तीव्र चिंता व्यक्त केली. संत परंपरेचा वारसा असलेल्या राज्यात अशा प्रकारचे प्रकार घडणं अत्यंत लाजिरवाणं असल्याचं त्यांनी म्हटलं. (Raj Thackeray on Ashok Kharat Case)
 
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगे बाबा आणि प्रबोधनकर ठाकरे यांचा उल्लेख करत महाराष्ट्राच्या परंपरेची आठवण करून दिली. अशा महान व्यक्तींचा वारसा असलेल्या राज्यात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला खतपाणी घालणारे नेते असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (Raj Thackeray on Ashok Kharat Case)
 
राजकारणातील सत्तेसाठीची धडपड, मंत्रिपदासाठीची स्पर्धा आणि अधिकाऱ्यांची सत्तेला चिकटून राहण्याची मानसिकता यामुळे अशा घटनांना खतपाणी मिळत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “हे सगळं महाराष्ट्राच्या समाजमनावर गंभीर परिणाम करत आहे,” असा इशाराही त्यांनी दिला. (Raj Thackeray on Ashok Kharat Case)
 

त्यासोबतच, माध्यमांना आवाहन करत त्यांनी सांगितलं की, अशा भोंदू बाबांचा पर्दाफाश करणं आवश्यक आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत हा विषय शांत होऊ देऊ नये. (Raj Thackeray on Ashok Kharat Case)
 

 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com