LPG price hike 2026: एलपीजी नंतर आता खाद्य तेलाच्या किंमतीही कडाडल्या, आणखी काय काय महागणार?

Total Views |
 
LPG price hike 2026
 
मुंबई : (LPG price hike 2026) सध्या मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात तब्बल ६० रूपयांनी वाढ झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता खाद्य तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. महागाईच्या या लाटेत आता पेट्रोल-डिझेलच्या दरातही वाढ होणार का? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढताना दिसत आहे. (LPG price hike 2026)
 
७ मार्चपासून १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फक्त घरगुती वापरच नाही, तर व्यावसायिक सिलेंडरमध्ये सुमारे १४४ रूपयांपर्यंत वाढ झाल्याने हॉटेल, कॅटरिंग आणि फूड इंडस्ट्रीवर मोठा परिणाम होत आहे. (LPG price hike 2026)
 
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल १२० डॉलरच्या जवळ पोहोचले आहेत. यामागे मध्य-पूर्वेतील वाढता तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील अस्थिरता ही मुख्य कारणे आहेत. भारत हा कच्च्या तेलाचा मोठा आयातदार देश असल्याने जागतिक बाजारातील बदलांचा थेट परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होऊ शकतो. (LPG price hike 2026)
 
हेही वाचा: LPG shortage: एलपीजी टंचाईत दिलासा! होर्मुझ पार करत ‘नंदा देवी’ एलपीजी टँकर भारतात दाखल... 
 
पेट्रोल-डिझेल सध्या स्थिर, पण धोका कायम...
 
१६ मार्च २०२६ पर्यंत देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. हे दर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या तेल कंपन्यांच्या डायनॅमिक प्राइसिंग सिस्टमनुसार दररोज बदलले जातात. (LPG price hike 2026)
 
महाराष्ट्रात पेट्रोल: ₹१०४–१०५ प्रति लिटर
 
दिल्लीत पेट्रोल: ₹९४.७७
 
दिल्लीत डिझेल: ₹८७.६७
 
पेट्रोल-डिझेल महागणार का?
 
तज्ज्ञांच्या मते, तात्काळ दरवाढ होण्याची शक्यता कमी आहे. सरकारकडे पुरेसा सामरिक साठा उपलब्ध आहे. शिवाय, पर्यायी देशांकडून आयात सुरू आहे आणि ग्राहकांना अचानक धक्का बसू नये यासाठी दर नियंत्रित ठेवले जात आहेत. मात्र, जागतिक तणाव कायम राहिल्यास भविष्यात दरवाढ होऊ शकते. (LPG price hike 2026)
 
हे वाचलात का?: Nanda Devi LPG Ship: एलपीजी इंधनवाहू नौका शिवालिक भारतात पोहोचली..
 
पुढे काय महागणार?
 
जर पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, तर त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो:
 
वाहतूक खर्च वाढेल
 
किराणा आणि दैनंदिन वस्तू महागतील
 
बांधकाम साहित्याचे दर वाढतील
 
हॉटेल-रेस्टॉरंटचे बिल वाढेल
 
कारण भारतातील बहुतांश लॉजिस्टिक्स आणि वाहतूक व्यवस्था डिझेलवर आधारित आहे. (LPG price hike 2026)
 
प्रत्येक राज्यात दर वेगळे का?
 
पेट्रोल-डिझेलचे दर राज्यागणिक वेगवेगळे असण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत: (LPG price hike 2026)
 
केंद्र सरकारचा एक्साइज ड्युटी
 
राज्य सरकारांचा VAT (मूल्यवर्धित कर)
 
वाहतूक खर्च
 
डीलर कमिशन
 
यामुळेच महाराष्ट्र, राजस्थान, केरळ यांसारख्या राज्यांमध्ये इंधनाचे दर जास्त दिसून येतात. (LPG price hike 2026)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com