Nanda Devi LPG Ship: एलपीजी इंधनवाहू नौका शिवालिक भारतात पोहोचली..

Total Views |
Nanda Devi LPG Ship
 
नवी दिल्ली : (Nanda Devi LPG Ship) पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ऊर्जा पुरवठा, सागरी वाहतूक आणि त्या प्रदेशातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सोमवार, दि. १६ मार्च रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय मीडिया केंद्रात आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत देण्यात आली. या परिषदेत पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालय तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा दिला. (Nanda Devi LPG Ship)
 
सागरी वाहतुकीच्या संदर्भात, होर्मुझ सामुद्रधुनी पार केलेल्या दोन भारतीय एलपीजी जहाजांपैकी ‘शिवालिक’ हे जहाज आज मुंद्रा बंदरात पोहोचणार असून ‘नंदा देवी’ उद्या सकाळपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. पर्शियन आखातात सध्या २२ भारतीय जहाजांवर ६११ भारतीय नाविक सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. (Nanda Devi LPG Ship)
 
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवत आहे. २८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत सुमारे २ लाख २० हजार प्रवासी त्या प्रदेशातून भारतात परतले आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावास पूर्णपणे कार्यरत असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४x७ हेल्पलाईन आणि नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. (Nanda Devi LPG Ship)
 
हेही वाचा: चावडीवरील कुचाळयांचा अमेरिकी प्रयोग!
 
होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतही देशातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा सुरळीत असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले. देशातील सर्व तेल शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत असून कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर असल्याने आयातीची गरज नसल्याचेही सांगण्यात आले. देशभरातील कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा नसल्याचे तेल विपणन कंपन्यांनी स्पष्ट केले असून नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाची साठेबाजी करू नये, असे आवाहन करण्यात आले. (Nanda Devi LPG Ship)
 
नैसर्गिक वायूच्या बाबतीत प्राधान्य क्षेत्रांना शंभर टक्के पुरवठा सुरू असून सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा अखंड आहे. औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्राला सुमारे ८० टक्के पुरवठा केला जात आहे. शहरांमध्ये जिथे पाइपलाईनचे जाळे उपलब्ध आहे तिथे पीएनजी जोडण्या घेण्याचे आवाहन करण्यात आले असून अनेक सीजीडी कंपन्या ग्राहकांना सवलतीही देत आहेत. (Nanda Devi LPG Ship)
 
एलपीजी पुरवठ्यावरही सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. देशातील तेलशुद्धीकरण प्रकल्पांमधून घरगुती एलपीजी उत्पादनात ३६ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ऑनलाईन एलपीजी सिलेंडर बुकिंगचे प्रमाण ८४ टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी विविध राज्यांत छापेमारी सुरू असून सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी १,१०० पेक्षा अधिक विक्री केंद्रांची तपासणी केली आहे. (Nanda Devi LPG Ship)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.