Palika Elections : "अबकी बार, सो पार" महायुतीचा निर्धार
06-Jan-2026
Total Views |
ठाणे : (Palika Elections) सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत "विकासाला गती पर्याय : एकच भाजप - महायुती" हा महायुतीचा "निर्धारनामा" ठाण्यातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रकाशित करण्यात आले, यावेळी माजी खासदार डॅा. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना प्रदेश सचिव राम रेपाळे, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, प्रवक्ता सागर भदे आदी उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारने अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातुन झालेली कामे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याकडे दिलेलं विशेष लक्ष आणि ठाणेकरांच्या मनामध्ये भाजप-शिवसेना महायुतीने मिळवलेले स्थान, या शिदोरीवर ह्या महापालिका निवडणुकीत महायुती अब की बार १०० पार करेल असा विश्वास राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. (Palika Elections)
या प्रसंगी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार संजय केळकर यांनी सांगितले कि, महायुतीच्या निर्धार नाम्याचे प्रकाशन करण्यात आले, यामध्ये ठाण्याचा विकास कसा करायचा आहे, त्याचा देखील उल्लेख आहे, ठाणे शहर हा विकासाचा हब झाला पाहिजे, शहरातील विद्यार्थ्याला शिक्षणासाठी बाहेर गावी न जाता त्याला ह्याच शहरात सुविधा मिळाली पाहिजे असे नियोजन आम्ही केले आहे, वाहतूक कोंडी मुक्त असे काम आमच्या डोक्यामध्ये आहे. ठाणेकरांचे हॅप्पीनेस वाढवण्याकरिता आम्ही ह्या जाहीरनाम्याद्वारे निर्धार केला आहे, यामुळे मला ठाम विश्वास आहे कि, ठाणेकर आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. (Palika Elections)
भाजप- शिवसेना महायुतीने ठाणे शहरासाठी ५४ कलमी 'निर्धारनामा' जाहीर केला आहे. ज्यात शहरात मिनी क्लस्टर योजना राबविण्यासह ठाणेकरांसाठी २४ तास पाणी पुरवठा, नवीन गृहसंकुलांसाठी पाण्याच्या पुनर्वापराचे धोरण जाहीर केले आहे. तसेच, दर तीन महिन्यांनी प्रभागसभा घेऊन प्रभागनिहाय खर्चाचा डिजिटल बोर्ड लावला जाईल. स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक ठाणे साकारण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातुन तलावांचे सुशोभीकरण व पर्यटन सुविधा विकसित केल्या जातील. कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्या बरोबरच शहरात भूमीगत कचरा कुंड्या बसवण्यात येतील.त्याचप्रमाणे दुबार नालेसफाईसह मलनि:स्सारण ऑडिट व कृती आराखडा केला जाईल. शहरासाठी कॅन्सर हॉस्पिटल, एम्सच्या धर्तीवर भव्य रुग्णालय, महिलांसाठी नियमित आरोग्य तपासणी व्हॅन्स, ठाणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने सहा ते आठ भव्य पार्कस, नाट्यगृहे, फिल्म फेस्टिव्हल, स्ट्रीट आर्ट, संगीत महोत्सव, डिजिटल ग्रंथालये आदीसह नवीन स्टेडियम उभारून आयपीएल व आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन केले जाईल. कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख डिजिटल शिक्षणाबरोबरच महापालिका शाळांमध्ये अर्ध-इंग्रजी पद्धती, सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासह टीएमटी सेवेचा दीर्घकालीन कृती आराखडा तयार करण्यात येणार असुन प्रत्येक मेट्रो स्टेशनपासून परिसरात जाण्यासाठी मिनी बसचे नेटवर्क उपलब्ध केले जाईल. आधुनिक पार्किंग स्टेशन आणि ठाणे शहरात इंटर्नल रिंग मेट्रो बनविण्याचा निर्धार महायुतीने व्यक्त केला आहे. (Palika Elections)
ठाणेकरांना उत्तम पायाभूत सुविधा देण्याकरीता शहरातील १९७ कि.मी. रस्त्यांचे सखोल ऑडिट करून,१० वर्षे टिकतील असे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. पादचाऱ्यांना प्राधान्य असणारे महापालिकेचे स्वतंत्र पदपथ धोरण तसेच फेरीवाला धोरण लागू करणार असुन जुन्या इमारतींच्या पुनर्विकास मंजुरीसाठी एक खिडकी योजनाही राबवण्यात येणार असल्याचा निर्धार महायुतीने व्यक्त केला आहे. (Palika Elections)
पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि पुमुक्त ठाणे: ठाण्यातील प्रत्येक घरात पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, विशेष निधीतून जुन्या गळती पाईप लाईन बदलल्या जातील, ठाणे महानगरपालिकेचे स्वतःचे धरण उभारले जाईल, नवीन गृहसंकुलासाठी पाण्याच्या पुनर्वापराचे धोरण व त्यासाठी साहाय्य दिले जाईल, वार्ड निहाय ड्रेनेज व कृती आराखडा जाहीर केला जाईल,ड्रेनेजचे कामे वर्षभर सुरु राहतील अशी धोरणात्मक अंमलबजावणी केली जाईल,ड्रेनेज कामाची प्रगती ऑनलाईन डॅशबोर्ड वर उपलब्द असेल, नाले सफाई दुबार केली जाईल. (Palika Elections)
मजबूत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था:
एम्सच्या धर्तीवर भव्य रुग्णालयाकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा, महिलांसाठी नियमित आरोग्य तपासणी व्हॅन्स, महापालिका रुग्णालयांचे आधुनिकीकरण,साथीच्या रोगाकरिता स्वतंत्र रुग्णालय व उपकेंद्र, ठाणे शहरासाठी कँसर रुग्णालय उभारण्यात येईल. (Palika Elections)
शिक्षण, कौश्यल्य विकास आणि रोजगार :
महापालिका शाळेमध्ये अर्ध -इंग्रजी पद्धत, स्टेम शिक्षण, कोडिंग,डिजिटल शिक्षण, महापालिका शाळांमध्ये दर्जेदार, सुविधायुक्त शिक्षणाची सोया करू,ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व्यवस्था निर्माण करू, शिक्षकांसाठी वार्षिक सक्तीचं करू, एज्युकेशन क्लस्टर व नामांकित कॉलेजेस, स्टार्टअप मार्गदर्शन केंद्र,को- वर्किंग स्पेस, व्हायब्रन्ट ठाणे गुंतवणूक परिषद व भव्य प्रशिक्षण केंद्र. (Palika Elections)
सार्वजनिक वाहतूक :
पीएम इ बस सेवा योजना अंतर्गत इलेक्ट्रिक बसेसची संख्या १००० पर्यंत वाढवली जाईल, ठाणे महानगरपालिका परिवहनचे प्रोसेस ऑडिट करून डिसेंबर २०२६ पर्यंत दीर्घकालीन कृती आराखडा तयार केला जाईल, प्रत्येक मेट्रो स्टेशनपासून परिसरात जाण्यासाठी मिनी बस नेटवर्क उभारले जाईल,सर्व बस थांब्याचे सर्वेक्षण करून शेड्स व डिजिटल फलक बसवले जातील,स्मार्ट टीएमटी प्रणालीद्वारे बस कुठे आहे व किती वेळात येईल याची अचूक माहिती ऍप वर उपलब्द असेल, ठाणे शहरात इंटर्नल रिंग मेट्रो बनवणार,
उत्तम पायाभूत सुविधा -कागदावर नव्हे, रस्त्यावर जाणवणाऱ्या :
महापालिका हद्दीतील १९७ किमी रस्त्याचे सखोल ऑडिट करून काँक्रीटीकरण झालेले नाही,तिथपर्यंत काँक्रीटीकरण पूर्ण केले जाईल, निकृष्ट दर्जाच्या काँक्रीट रस्त्यासाठी नव्याने काम काढून किमान १० वर्ष ते काम टिकेल असे रस्ते काम केले जाईल, पाणी, गॅस,मोबाईल व अन्य सेवा यासाठी एकदाच रस्ता खोदून कायमस्वरूपी डक्टिंग केले जाईल,यासाठी ठोस धोरण लागू केले जाईल,ठाणे महानगरपालिकेचे स्वतंत्र पदपथ धोरण लागू केले जाईल,ह्यात पादचाऱ्यांचा पहिला आणि अंतिम हक्क असेल, फुटपाथ करीत प्लास्टिक फेवर बॉक्स वापरले जातील,फुटपाथ अतिक्रमण कारवाईसाठी वार्ड स्तरीय नागिरक प्रशासन समित्या स्थापन केल्या जातील,शाळा रुग्णालय बाजार परिसरात विशेष तक्रार कक्ष असतील,ठाणे शहरात मिनी क्लस्टर योजना राबवणार, सुरक्षित, स्वच्छ शौचालय,फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणार, जुन्या इमारतींच्या पुनर्विकास मंजुरी प्रक्रियेसाठी एक खिडकी योजना राबवणार. (Palika Elections)
पारदर्शक डिजिटल प्रशासन :
UMANG धर्तीवर महापालिकेचे एकात्मिक ऍप, My Gov धर्तीवर नागरिक सहभाग मंच,वार्ड निहाय खर्चाचा डिजिटल बोर्ड, दर तीन महिन्यांनी वार्ड सभा.
लाडक्या बहिणी सुरक्षा आणि संधी :
उद्यानाची जबाबदारी महिला बचतगटाकडे, महिला मोबाईल शौचालय,कामगार महिलांकरिता पाळणाघर,महिला बचत गटासाठी विशेष बाजारपेठ,महापालिकेत महिलांसाठी विशेष सेवा खिडकी, वर्किंग वुमन हॉस्टेल.
उद्यान क्रीडा व सांस्कृतिक ठाणे :
सुरक्षित, सुविधायुक्त उद्यान व मैदाने,६-८ नवीन भव्य उद्याने पार्क्स, नवीन स्टेडियम IPL व आंतरराष्ट्रीय स्पर्धा, ठाणे सांस्कृतिक राजधानी :नाट्यगृह फिल्म फेस्टिव्हल,स्ट्रीट आर्ट,संगीत महोत्सव,डिजिटल ग्रंथालय,नवोदित कलाकारांना नाट्य, तालीम करण्याची व विविध कलांचे प्रशिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणार.
स्वच्छ हरित व पर्यावरण पूरक ठाणे :
ठाण्याची तळी व डोंगर आणि हिरवाई जपली जाईल, बुजलेली तळी आणि विहिरी पुनर्जीवित केले जाईल, सीएसआर निधीतून तळ्यांचे सुशोभीकरण व पर्यटन व्यवस्था सुरळीत केल्या जातील,ओला सुका कचरा वर्गीकरणाची जनजागृती, कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणार.