मुंबई : ( BJP Protests Against Uddhav Thackeray ) कोकणचे सुपुत्र आणि मुंबईचा मराठी माणूस भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्यावर उद्धव ठाकरेंनी खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध सोमवार दि.५ रोजी भाजपच्या वतीने वरळी येथे करण्यात आला. यावेळी भाजपा मुंबई महामंत्री राजेश शिरवडकर यांसह, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
"इतके दिवस ज्या मराठी, मालवणी, कोकणी माणसाच्या जीवावर नुसते राजकारण केले तोच मराठी, मालवणी , कोकणी माणूस तुम्हाला येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत पाणी पााजणार हे नक्की." असे प्रतिपादन राजेश शिरवडकर यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.