BMC Elections : महापालिका विजयाचा मंदिर कॉरिडॉर

Total Views |

BMC Elections
 
मुंबई : (BMC Elections) भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पहिल्यापासूनच ठाम आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर हिंदू - मराठी होणार हे जाहीर केले आहे. मुंबईत सुमारे ऐंशी लाखाच्या जवळपास हिंदू मतदार आहेत. त्यामुळेच भाजपकडून हिंदूंच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबादेवी, बाबुलनाथ, महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक मंदिरांना जोडणारा एक मंदिर कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. (BMC Elections)
 
याबाबत मुंबईचे भाजप महामंत्री पवन त्रिपाठी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, भारतीय जनता पक्षाने हिंदुत्व हे प्रथमस्थानी ठेवलेले आहे. हिंदू तीर्थक्षेत्र विकासासाठी भाजप नेहमीच अग्रस्थानी असते. या निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले, मराठी अ-मराठी असा कोणताही मुद्दा नाही. भाजपने मराठी माणसाला घरे दिली आहेत. बीडीडी चाळ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. खरेतर मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनीच केले आहे. (BMC Elections)
 
हेही वाचा : Ameet Satam : मुंबई महापालिकेत २५ वर्षांत देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार: आ. अमीत साटम
 
यावेळी त्यांनी महायुती १५० जागा जिंकेल, त्यापैकी भाजप १०० हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, ही निवडणूक सुरक्षा आणि विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात आहे. शहराचा विकास असाच सुरू राहावा यासाठी लोकांनी फक्त भाजपलाच मतदान करावे. '२०१४ नंतर मुंबई एक अतिशय सुरक्षित शहर बनले. यापूर्वी येथे कायमच बॉम्बस्फोट होत होते. मुस्लिम महिलादेखील भाजपलाच मतदान करतील, कारण सुरक्षा हा एका धर्माचा विषय नाही. (BMC Elections)
 
अतिक्रमणांच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, घुसखोर आणि बेकायदेशीर अतिक्रमणांबद्दल भाजपने नेहमीच जागरूकता निर्माण केली आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर वस्त्यांचा प्रसार रोखण्यास मदत झाली. त्याचबरोबर मुंबईतील अंमली पदार्थांचे वाढणारे सेवनही कमी होईल. पदपथांवरील अतिक्रमणे हटवणे आणि पादचाऱ्यांना विनात्रास चालता यावा यासाठी भाजप वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. (BMC Elections)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.