Ranjit Yadav : मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचा विकासकामांचा आढावा दौरा

    03-Jan-2026
Total Views |
 
Ranjit Yadav
 
ठाणे : (Ranjit Yadav) जिल्हा परिषद ठाणेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी मुरबाड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना भेट देऊन दि. २ जानेवारी, २०२६ रोजी सुरू असलेल्या विकासकामांची तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. (Ranjit Yadav)
 
ग्रामपंचायत खेवारे येथे शाळेला भेट देऊन शाळेतील मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच शाळेतील संगणक प्रयोगशाळेला भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत शिक्षण देण्यावर भर देण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आवश्यक तयारी करून घेण्याच्या सूचना शाळेचे मुख्याध्यापक यांना देण्यात आल्या. शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी केल्यास विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी लाभ होतो, असे नमूद करून गटशिक्षणाधिकारी यांना सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत बसविणे व त्यांची तयारी करून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले. (Ranjit Yadav)
 
हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : ठाकरेंची मुलाखत म्हणजे मीडियासमोर येण्यासाठीचा प्रपंच; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका  
 
खेवारे ग्रामपंचायतीत शेततळ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाणी नियोजनामुळे निर्माण झालेल्या ‘जलसमृद्ध गाव’ या संकल्पनेचे कौतुक करण्यात आले. या उपक्रमातून जिल्ह्यातील इतर गावांना कसा फायदा होऊ शकतो व जास्तीत जास्त गावे टँकरमुक्त कशी होतील, यासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. ग्रामपंचायत खेवारे येथील लोकसहभागातून झालेल्या उत्कृष्ट कामाचे विशेष कौतुक करण्यात आले. (Ranjit Yadav)
 
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सुरू झालेली लोकचळवळ ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता नागरिकांचा सहभाग कायमस्वरूपी राहिला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. (Ranjit Yadav)
 
ग्रामपंचायत दहिगाव चाफे येथे शाळेची पाहणी करण्यात आली. सीएसआर निधीतून उपलब्ध झालेल्या वॉटर फिल्टर व स्मार्ट टीव्हीची पाहणी करून गटशिक्षणाधिकारी यांना सीएसआरच्या माध्यमातून अधिकाधिक शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. (Ranjit Yadav)
 
ग्रामपंचायत दहिगाव चाफे येथे बचत गटामार्फत तयार करण्यात आलेल्या बांबूच्या टोपल्यांची पाहणी करण्यात आली. आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लियस बजेटमधून आदिवासी महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच पीएम जनमन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांची पाहणी करून वेळेवर मस्टर काढण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. (Ranjit Yadav)
 
हे वाचलात का ?: मुंबईमध्ये १,७२९ उमेदवार, ४५३ जणांनी आपले अर्ज घेतले मागे 
 
ग्रामपंचायत सिंगापूर येथे पंचायत लर्निंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने विविध प्रशिक्षण कार्यक्रम येथे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पर्यटन विकासाच्या दृष्टीने बचत गटांच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले. तसेच येथे वाचनालयाचे उद्घाटन करून, विद्यार्थ्यांच्या सहभागातून समिती स्थापन करून वाचनालय चालविण्याबाबत सूचना देण्यात आल्या. (Ranjit Yadav)
 
सिंगापूर ग्रामपंचायतीत वनराई बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले. अशा पद्धतीचे वनराई बंधारे सर्व ग्रामपंचायतींनी उभारून जलसंधारणावर भर द्यावा व भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. (Ranjit Yadav)
 
या दौऱ्यादरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गंगाधर परगे, गट विकास अधिकारी मुरबाड लता गायकवाड तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ranjit Yadav)