Chandrashekhar Bawankule : ठाकरेंची मुलाखत म्हणजे मीडियासमोर येण्यासाठीचा प्रपंच; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

    03-Jan-2026   
Total Views |
 
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : (Chandrashekhar Bawankule) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत फिक्सिंग आहे. संजय राऊत मुलाखत घेतात आणि ते उत्तर देतात. आधीच नोंदी तयार असतात, त्यांना सांगितलेले असते, फक्त मीडियासमोर येण्यासाठी हा प्रपंच केलेला असतो. महाराष्ट्रात एवढी मीडिया असून त्या सर्वांच्या माध्यामातू मुलाखत झाली तर बरे होईल, अशी टीका महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.
 
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, "बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची खुशाल चौकशी करावी. आमच्या उमेदवारांना तिथल्या स्थानिक विषयांमध्ये समर्थन दिले. महायुतीचा उमेदवार निवडून आल्यास विकासाचे राजकारण होईल, हे जनतेला माहिती असल्याने आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. महाराष्ट्र हा प्रगल्भ असून इथली जनता सुशिक्षित आहेत. बिनविरोध होण्याचा पायंडा राज्याच्या दृष्टीने चांगला आहे. फार निवडणूका न होता बिनविरोध झाल्यास मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळेल. आता बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांनी सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करावे. फक्त चार ठिकाणी बंडखोरी शिल्लक असून त्यांनाही आम्ही समजावू. त्यांचे आम्हाला कसे समर्थन मिळेल याची काळजी घेऊ." (Chandrashekhar Bawankule)
 
हेही वाचा :  मुंबईमध्ये १,७२९ उमेदवार, ४५३ जणांनी आपले अर्ज घेतले मागे
 
मित्रपक्षात मतभेद होणार नाही याची काळजी घ्यावी
 
"मित्रपक्षात निवडणूका लढताना त्यांच्यात मतभेद आणि मनभेद होणार नाहीत, याची काळजी तिन्ही पक्षांनी घ्यायची, असे आमच्यात ठरलेले आहे. अजित पवार असे का बोलले, ते माहिती नाही, पण, त्यांनी बोलायला नको आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंतच्या निवडणूकीच्या कुठल्याही भाषणात कुठल्याही नेत्यावर किंवा पक्षावर टीका न करता विकासाचे व्हिजन मांडले. आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याने कुठलेही उत्तर देणार नाही किंवा टीकाटिपण्णी करणार नाही. पण अजित पवार यांच्यासह सर्व मित्रपक्षातील सर्वांना माझी विनंती आहे की, आपसात मतभेद किंवा मनभेद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी," असेही ते म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)
 
हे वाचलात का ?: ‘केस नं. ७३’ मुखवट्यामागील गडद रहस्य, लवकरच सिनेमागृहात 
 
सोलापूरच्या घटनेचा पोलिस तपास करतील
 
"सोलापूरमधील घटनेचा पोलिस तपास करतील आणि कारवाई करतील. कार्यकर्ता हा भाजपचा असो किंवा काँग्रेसचा, गुन्हा हा गुन्हा असून गुन्हे मान्य नाहीत. त्यामुळे यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी," असेही ते म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)
 
संजय राऊत यांनी अजित पवार भाजपची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत यावे, असा सल्ला दिला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, "संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांची फसगत झाली. आता त्यांनी अजित पवार यांना सल्ला देण्याची गरज नाही," असा टोला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....