BCCI : बीसीसीआयच्या निर्देशानुसार बांगलादेशी खेळाडूची हकालपट्टी

Total Views |
 
BCCI
 
मुंबई : (BCCI) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निर्देशानंतर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला आयपीएल २०२६ च्या संघातून काढून टाकले आहे. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आयपीयलमध्ये बांगलादेशी खेळाडूला घेतल्याने भारतातील संतसमाज आक्रमक झाला होता. (BCCI)
 
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता संघाने जारी केलेल्या मीडिया पत्रात म्हटले आहे की, आयपीएलचे नियामक म्हणून बीसीसीआयने आगामी इंडियन प्रीमियर लीगमधून मुस्तफिजूर रहमानला संघातून काढण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशांचे पालन म्हणून रहमानला केकेआर संघातून काढण्यात आले आहे. (BCCI)
 
हेही वाचा :  ‘काश्मीर बनेगा पाकिस्तान’ हे गाणे मुंबईत चालणार नाही
 
तसेच या पत्रात आयपीएलच्या नियमांनुसार बीसीसीआय कोलकाता नाईट रायडर्सला बदली खेळाडूची परवानगी देईल तसेच त्यासंबंधीचा अधिक तपशील वेळी कळवतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूचनेनुसार योग्य प्रक्रिया आणि सल्लामसलत केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, असेही त्यात म्हटले आहे. (BCCI)
 
याबाबत बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, बांगलादेशातील अलीकडील घडामोडींमुळे बीसीसीआयने हे पाऊल उचलत, केकेआर संघाला बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमान याला संघातून काढण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर जर त्यांनी कोणत्याही बदली खेळाडूची मागणी केली तर बीसीसीआय त्या बदलीची परवानगी देईल, असेही देवजित सैकिया यांनी सांगितले. (BCCI)
 
हेही वाचा : मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या एक तास ५८ मिनिटांत 
 
गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजूरला तब्बल ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले होते. यावर भाजपा आणि संत समुदायाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. सदरच्या निर्णयामुळे भाजपाचे माजी आमदार संगीत सिंग सोम म्हणाले की, भारतातील १०० कोटी सनातनींना विचारात घेऊन बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार. हा संपूर्ण देशातील हिंदूंचा विजय आहे. (BCCI)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.