Sangram Patil: एफआयआर रद्द करण्यासाठी संग्राम पाटील यांची याचिका, काय आहे पूर्ण प्रकरण?

Total Views |
 
Sangram Patil
 
मुंबई: (Sangram Patil) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांविरुद्ध 'आक्षेपार्ह' सोशल मीडिया पोस्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या युट्यूबर आणि युनायटेड किंग्डममधील डॉक्टर संग्राम पाटील यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवार दिनांक २२ जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. सध्या बातम्यांमध्ये चर्चेत असलेले संग्राम पाटील हे त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून सातत्याने पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि इतर भाजप नेत्यांवर टीका करत असतात. पण त्यांच्यावर कोणत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे? डॉक्टर संग्राम पाटील कोण आहेत? आणि या आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय? जाणून घेऊयात… (Sangram Patil)
 
डॉ. संग्राम गोपाळकृष्ण पाटील हे मूळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत, जे ब्रिटिश नागरिक असून, आता युनायटेड किंग्डममध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. डॉ. संग्राम हे त्यांच्या वैद्यकीय प्रैक्टिस सोबतच एक युट्यूब चॅनेल देखील चालवतात. युट्यूबवर चार लाख साठ हजार सबस्क्राइबर्स, तर फेसबुकवर एक लाख पंधरा हजार फॉलोअर्ससह ते एक प्रभावी युट्यूबर आहेत. कोविड-१९ साथीच्या काळात पाटील यांना लोकप्रियता मिळाली आणि त्यांनी फेसबुक, एक्स आणि यूट्यूबसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. सुरूवातीला ते पुराव्यांवर आधारीत आरोग्य सल्ला देणारे व्हिडिओ बनवत आणि त्यातूनच त्यांना फॉलोअर्स मिळाले असले, तरी आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक बोलके टीकाकार म्हणून व्यापकपणे ओळखले जातात. (Sangram Patil)
 
हेही वाचा : Congress MLA Controversy : हिंदू संमेलनात सहभागी झाल्यामुळे काँग्रेस आमदार अडचणीत
 
आताची त्यांची प्रत्येक पोस्ट ही पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि इतर भाजप नेत्यांवर टीका करणारी असते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचा हा सर्व प्रकार लक्षात घेत मोदी समर्थकांनी डॉ. संग्राम पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी पोलिसांना सांगितले की ऑनलाइन ब्राउझिंग करताना त्यांना एक आक्षेपार्ह पोस्ट आढळली आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्यापूर्वी पक्षाच्या नेत्यांकडे हा विषय उपस्थित केल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. (Sangram Patil)
 
पंतप्रधान मोदींची बदनामी करणारी सामग्री पोस्ट केल्याच्या आरोपाखाली पाटील यांच्याविरुद्ध १८ डिसेंबर रोजी NM जोशी मार्ग पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांचे सोशल मीडियावर मोठे फॉलोअर्स आहेत आणि त्यांनी भाजप नेत्यांबद्दल अनेक कथित बदनामीकारक लेख आणि टीप्पणी पोस्ट केल्या आहेत. डॉ. संग्राम पाटील हे जानेवारी महिन्याच्या सुरूवातीलाच त्यांच्या पत्नीसोबत भारतात आले होते. मात्र, मोदी समर्थकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून लूक-आउट सर्क्युलर (LOC) जारी केल्यानंतर १० जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर, सोमवारी पुन्हा युकेला परतणाऱ्या डॉक्टर आणि युट्यूबर संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. (Sangram Patil)
 
हे वाचलात का ?: Chandrashekhar Bawankule : अतिउत्साह फार काळ टिकत नाही; सहर शेख यांच्या विधानावर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया 
 
या सर्व प्रकरणाची कायदेशीर कारवाई १४ डिसेंबर २०२५ रोजीच्या एका पोस्टवर केंद्रीत आहे, ज्यामध्ये तक्रारदाराने दावा केला होता की त्यात चुकीची माहिती आणि शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने अपमानजनक टिप्पणी आहे. त्यामुळे एफआयआर नोंदवल्यानंतर लगेचच जारी केलेल्या लूक आऊट सर्क्युलर (एलओसी ) अंतर्गत पाटील यांना ताब्यात घेण्यात आले . १५ तासांच्या चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. पुढे मुंबई गुन्हे शाखेने पुष्टी केली की एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३(२) अंतर्गत आरोप समाविष्ट आहेत , जे वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणारी खोटी माहिती पसरवण्याशी संबंधित आहे. दीर्घ चौकशी असूनही, पाटील यांना औपचारिकपणे अटक करण्यात आली नाही. (Sangram Patil)
 
पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावली, ही तरतूद अधिकाऱ्यांना, कमी कारावासाच्या गुन्ह्यांसाठी त्वरित अटक न करत चौकशीसाठी व्यक्तीला हजर राहण्याचे आदेश देण्याची परवान देते. मात्र डॉ. संग्राम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. पाटील यांनी एफआयआर आणि लुक आउट सर्क्युलर (LOC) रद्द करण्याची मागणी करत, तात्पुरती चौकशी थांबवण्याची विनंती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २२ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना याबाबत नोटीस बजावली असून, पुढील सुनावणी ४ फेब्रुवारीला होणार असल्याची शक्यता आहे. तोपर्यंत त्यांना देश न सोडण्याचे आदेश दिले आहेत. (Sangram Patil)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com