मुंबई : (Congress MLA Controversy) मध्य प्रदेशच्या टिमरणी येथील रहाटगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू संमेलन भरवण्यात आले होते. यामध्ये तेथील काँग्रेसचे स्थानिक आमदार अभिजित शाह सहभागी झाले होते.(Congress MLA Controversy) त्यांना या सहभागामुळे मध्य प्रदेश काँग्रेस समितीने स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच समितीने याबाबतचा अहवाल राज्य प्रभारी हरीश चौधरी यांना अहवाल सादर करून कारवाईची मागणी केली आहे.(Congress MLA Controversy)
मिळालेल्या माहितीनुसार, संघ शताब्दी निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच निमित्ताने मध्यप्रदेशच्या विविध तालुक्यांत हिंदू संमेलने आयोजित केली जात आहेत. (Congress MLA Controversy) अशाच रहाटगाव येथील संमेलनात काँग्रेस आमदार उपस्थित राहिले होते. यावर पक्षाच्या विचारधारेविरूद्ध कृत्य केल्याने कारवाई का करु नये यासाठी त्यांना काँग्रेसच्या वरिष्ठांकडून विचारणा करण्यात आली.(Congress MLA Controversy)
अभिजीत शाह यांनी कार्यक्रमात सहभाग घेतल्यानंतर हरदा जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या सहभागावर सर्वप्रथम आक्षेप घेतला. हरदा जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते आदित्य गर्गवा यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून अभिजित शाह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.(Congress MLA Controversy) या पत्रात अभिजीत शाह यांचे गांधी, नेहरू, पटेल आणि मौलाना आझाद यांच्या विचारसरणीशी जुळते की संघाच्या विचारांशी जुळते असा प्रश्नही या पत्रात उपस्थित करण्यात आला.(Congress MLA Controversy)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.