
या जमीन गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar Mundhwa Land Scam) आणि त्यांच्या कंपनीत भागीदार असलेले, दिग्विजय पाटील हे चांगलेच अडचणीत सापडत असल्याच पाहायला मिळत आहे. आता या प्रकरणी दिग्विजय पाटील यांना चौकशीसाठी बावधान पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश पुणे पोलिसांकडून देण्यात आले असून, या प्रकरणातील आरोपी रवींद्र तारूला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (Parth Pawar Mundhwa Land Scam)
मुंढव्यातील ४० एकर जमीन घोटाळाप्रकरणातील प्रथम आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली. याप्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातील आणखी एक आरोपी रवींद्र तारुला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बावधन पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली होती. (Parth Pawar Mundhwa Land Scam)