Dr. Mohanji Bhagwat : संघ स्वस्थ समाज आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीचे कार्य करतो

प्रबुद्ध नागरिक संवादात सरसंघचालकांकडून संघाच्या शंभर वर्षांची मांडणी

Total Views |
Dr. Mohanji Bhagwat
 
मुंबई : (Dr. Mohanji Bhagwat) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अंदमान आणि निकोबार बेटावरील डीबीआरएआयआयटी सभागृहात प्रबुद्ध नागरिक संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत (Dr. Mohanji Bhagwat) यांनी प्रबुद्ध विचारवंतांसमोर संघाच्या शंभर वर्षांच्या कार्याची मांडणी केली. सरसंघचालक म्हणाले की, (Dr. Mohanji Bhagwat) संघाचे कार्य समाजात मूल्यांवर आधारित जीवनशैलीचा प्रचार करत स्वस्थ समाज आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीचे आहे.(Dr. Mohanji Bhagwat)
 
ते पुढे म्हणाले (Dr. Mohanji Bhagwat) की, प्राचीन भारतीय सनातन संस्कृती स्वीकारून आणि स्वदेशी स्वावलंबनाला प्रोत्साहन देऊन प्रत्येक नागरिक राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतो. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, शिक्षण आणि राष्ट्रीय दृष्टिकोनांशी संबंधित प्रश्नांना उत्तरे दिली.(Dr. Mohanji Bhagwat)
 
हेही वाचा : Rashtriya Swayamsevak Sangh : केवळ एक संघटित समाजच राष्ट्राला परम वैभवापर्यंत पोहोचवू शकतो
 
या संवादात स्थानिक लोकप्रतिनिधी, निवृत्त अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, वकील, प्रख्यात व्यापारी, कलाकार, विविध सामाजिक आणि धार्मिक स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, माध्यमांचे प्रतिनिधी आणि विजयपुरममधील अनेक सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने झाली.(Dr. Mohanji Bhagwat)
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.