Adv. Ujjwal Nikam : २६/११ च्या मास्टर माईंडला पाक वाचवतोय : अॅड. निकम

    26-Nov-2025
Total Views |
Adv. Ujjwal Nikam
 
मुंबई : (Adv. Ujjwal Nikam) २६/११च्या पाकिस्तानने मुंबईत केलेल्या भ्याड हल्ल्यात जे खऱ्या अर्थाने हुतात्मा झाले, धारातीथ पडले. त्यांना आम्ही आजपर्यंत न्याय देऊ शकलो नाही, याची खंत प्रसिद्ध विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांनी व्यक्त केली. या हल्ल्यात सामील अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले. कसाबला फाशीची शिक्षा देण्यात येईपर्यंत या खटल्याचे काम ॲड. निकम यांनी पाहिले. याबाबत दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’शी त्यांनी साधलेला संवाद. (Adv. Ujjwal Nikam)
 
हेही वाचा : Rajesh Shirwadkar : मदर मेरी चे रूप दिलेली देवीची मूर्ती मूळ रूपात
 
या हल्ल्याचा खरा मास्टर माईंड कोण? तो अजूनही मोकाट का आहे?
 
26/11च्या हल्ल्यात जे मारणारे होते, त्यांना आपण यमसदनी पाठवले. परंतु, या हल्ल्याची योजना, संपूर्ण कट आणि हल्ल्याचे म्होरके आहेत, त्यांच्यापर्यंत आजही आपण पोहोचू शकलो नाही. त्यासंदर्भात आपल्याला स्पष्ट पुरावा मिळाला आहे. ‌‘हाफिज सईद‌’, ‌‘लष्कर-ए-तोयबा‌’चा संस्थापक झकी उर रेहमान लाखवी, जो सगळ्या घटनेत ऑपरेशनल कमांडर होता. या दोघांना पाकिस्तान सरकार वाचवत आहे, हे आम्ही पुराव्यासह सिद्ध केले आहे. हे दोघे हे आजही भारताविरुद्ध चिथावणी देणारी भाषणे करीत आहेत. त्यांना आम्ही कायद्याच्या कक्षेत आणू शकत नाही, कारण ते पाकिस्तानात आहे. त्यामुळेच हल्ल्यात जे हुतात्मा झाले, धारातीथ पडले, त्यांना आम्ही खऱ्या अर्थाने न्याय दिला नाही, असे मला वाटते. (Adv. Ujjwal Nikam)
 
हा खटला जेव्हा तुमच्याकडे आला, त्यावेळी सर्वांत पहिल्यांदा मनात काय विचार आला?
 
तेव्हा मला विलक्षण अभिमान वाटला. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, लोकशाही सुदृढ करण्याकरिता आपल्याला एक चांगली संधी मिळाली, असे वाटले. आपण पूर्ण निष्पक्षपातीपणे, पारदशपणे हा खटला चालवला. आम्ही प्रसारमाध्यमांना न्यायालयात हजर ठेवले होते. कसाबच्या बचावासाठी दोन वकील नेमले होते. सरकारतर्फे मी एकटा खटला चालवत होतो. पाकिस्तानमध्येदेखील या खटल्याच्या गुणवत्तेबद्दल कुठेही शंका उपस्थित केली गेली नाही. मात्र, वाईट या गोष्टीचे वाटते की आपल्याच देशातला अर्थात मुश्रीफसारखा माजी पोलीस अधिकारी या खटल्याच्या गुणवत्तेबद्दल शंका उपस्थित करतो. साळसकर, करकरे यांना दहशतवाद्यांनी मारल्यानंतरही तो म्हणतो की, करकरेंना ‌‘आरएसएस‌’च्या इन्स्पेक्टरने मारले, असे तो पुस्तकात लिहितो. ही किती मोठी शोकांतिका आहे. (Adv. Ujjwal Nikam)
 
हे वाचलात का ?:  Ram Mandir : भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा ‌‘धर्मध्वज‌’; शतकांच्या स्वप्नांचे साकार रूप : पंतप्रधान
 
26/11च्या हल्ल्यानंतर तुम्हाला भारतात एकी जाणवली का?
 
ज्यावेळी देशावर पाकिस्तानने हल्ला केला, त्यावेळी आपण भारतातले सर्व धर्माचे नागरिक एकत्र आहेत, हे दाखवून दिले. पाकिस्तानला असे वाटत असेल की हिंदू-मुस्लीम हा वाद निर्माण करून भारतात फूट पाडू, तर तो त्यांचा मोठा गैरसमज आहे. या देशाच्या भूमीचा हाच मोठा गुणधर्म आहे की, तुम्ही धार्मिक कलह निर्माण केला, तर तो यशस्वी होणार नाही. कसाबच्या हातात लाल धागा होता. त्याचबरोबर मद्रास कॉलेजचे एक ओळखपत्र होते. जेणेकरून तो हिंदू असल्याचं दाखवले गेले. यातून देशात धार्मिक वाद निर्माण करण्याचा कट पाकिस्तानने आखला होता. परंतु त्यांचा उद्देश सफल झाला नाही. (Adv. Ujjwal Nikam)