Rajesh Shirwadkar : मदर मेरी चे रूप दिलेली देवीची मूर्ती मूळ रूपात
26-Nov-2025
Total Views |
मुंबई : (Rajesh Shirwadkar) असामाजिक तत्त्वांकडून हिंदूंच्या कालिकामातेच्या मूतचे रंग लावून, ख्रिस्ती पोशाख चढवून धर्मांतर केल्याचा प्रकार चेंबूरमध्ये उघडकीस आला होता. यामुळे चेंबूर माहूल गावातील ‘बीपीसीएल कंपनी’जवळ असलेल्या मंदिर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या मंदिरात शुद्धीकरण विधी, दुग्धाभिषेक करून आवारात श्रीराम ध्वजाची स्थापना करण्यात आली आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने या प्रकाराला दि. 25 नोव्हेंबर रोजीच्या अंकात वाचा फोडली होती. (Rajesh Shirwadkar)
दै. ‘मुंबई तरुण भारत’मधील वृत्त पाहिल्यानंतर मुंबई भाजप सरचिटणीस राजेश शिरवडकर (Rajesh Shirwadkar) यांनी तातडीने मंदिरात भेट दिली. पदाधिकाऱ्यांसमवेत मंदिराची पाहणी केली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंदिरातील पुजाऱ्यासह दोन अन्य धमय व्यक्ती मूतच्या कन्व्हर्जन प्रकारात सामील असल्याचे समोर आली आहे. स्थानिकांमध्ये यामुळे प्रचंड संतापाची भावना दिसत आहे. राजेश शिरवडकर यांच्या पुढाकाराने मंदिरात विधिवत दुग्धाभिषेक करून मूतचे पावित्र्य पुनर्स्थापित करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. “अयोध्येत 500 वर्षांनंतर धर्मध्वजाची स्थापना ज्या भावनेने झाली, त्याच भावनेने कालिकामाता मंदिरात श्रीराम ध्वज प्रतिष्ठापित करण्यात आला,” असे शिरवडकर यांनी सांगितले. या उपक्रमात मंडळ अध्यक्ष रवी केदारे, वॉर्ड अध्यक्ष राम शिंदे, विजय देसाई, प्रियंका शुक्ला, राज लोखंडे, वेदांत लालवाणी, राजेश सिंग, विलास पराडकर, अनिल बेनिवाल, दगडू खंदारे तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. (Rajesh Shirwadkar)