प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश; बिहारच्या 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

    14-Oct-2025   
Total Views |
 
Maithili Thakur
 
मुंबई : (Maithili Thakur joins BJP) लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर (Maithili Thakur) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या उपस्थितीत मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी मैथिली (Maithili Thakur) यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाला. माध्यमांमधील माहितीनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीत मैथिली ठाकूर (Maithili Thakur) दरभंगामधील अलीनगरच्या जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
 

 
समाजाची सेवा करण्यासाठी इथे - मैथिली ठाकूर

पक्षात सामील झाल्यानंतर मैथिली ठाकूर (Maithili Thakur) म्हणाल्या, "मी पंतप्रधान आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विचारांनी खूप प्रभावित आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन, मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी येथे आहे. राजकीय पक्षात सामील झाल्याने तुम्ही राजकारणी बनता असे मला वाटत नाही; मी समाजाची सेवा करण्यासाठी आणि त्यांची विचारसरणी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी येथे आहे. मी मिथिलानगरीची कन्या आहे, माझा आत्मा मिथिलामध्ये राहतो... पक्ष जे काही आदेश देईल ते मी करेन. मी नेहमीच संगीत आणि संस्कृतीच्या माध्यमातून बिहारच्या लोकांशी जोडलेली आहे. आता मला सार्वजनिक जीवनातून त्यांची सेवा करायची आहे"


 
काही दिवसांपूर्वीच घेतली होती विनोद तावडेंची भेट
 
मैथिली ठाकूर (Maithili Thakur) यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली होती. ज्यानंतर मैथिली ठाकूर भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात होत्या. त्या खऱ्या ठरल्या आहेत. मैथिली ठाकूर (Maithili Thakur) या भाजपात आल्याने त्यांच्या खांद्यावर भाजपकडून प्रचाराची धुरा टाकली जाण्याचीही शक्यता आहे. मैथिली ठाकूर या लोकप्रिय आहेत आणि त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. याचा फायदा भाजपला बिहार निवडणूकीमध्ये नक्कीच होऊ शकतो.
 
 


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\