MTV Music चॅनेल्स लवकरच होणार बंद; नेटकऱ्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा

    14-Oct-2025   
Total Views |
 
MTV Music
 
मुंबई : (MTV Music) संगीतप्रेमींच्या गळ्यातलं ताईत बनलेलं MTV हे जगप्रसिद्ध म्युझिक चॅनल आता लवकरच बंद होणार आहे. हे चॅनेल ३१ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे बंद होणार आहे. याबाबत पॅरामाउंट ग्लोबलने अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये MTV Hits, MTV 80s, आणि MTV 90's सारख्या म्युझिक चॅनेल्सचा समावेश आहे.
 
हेही वाचा -  Mumbai Metro Ticket Booking : मुंबई मेट्रो ३ चं तिकीट आता 'WhatsApp' वर, पण ते मिळवायचं कसं ?
 
MTV चॅनेल्स बंद का होतायत?
 
MTV चॅनेल्स बंद होण्यामागं मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षांपासून संगीत आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात झालेला मोठा बदल आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या बदलेल्या सवयी. आज तरुण पिढी टेलिव्हिजनऐवजी संगीत ऐकण्यासाठी YouTube, Spotify, Apple Music यांसारख्या डिजिटल माध्यमांना प्राधान्य देते. परिणामी, या माध्यमांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पारंपरिक संगीत टीव्ही चॅनेल्सवरील प्रेक्षकांची संख्या कमी झाली आहे. पूर्वी अनेक संगीत व्हिडीओसाठी ओळखला जाणारा MTV हळूहळू रिअॅलिटी शो आणि पॉप कल्चर आधारित आशयाकडे वळला. ज्यामुळे कंपनीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डिजिटल युगातील प्रेक्षकांच्या सवयींमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, भारतातील चॅनेलही बंद होईल की नाही, याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.
 
 
नेटकऱ्यांकडून 'नॉस्टॅल्जिक' निरोप
 
MTV बॅनेल्स बंद होणार असल्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्यांनी आपले बालपण आणि तारुण्य या चॅनेल्सवर आपल्या आवडत्या कलाकारांची गाणी ऐकण्यात घालवले त्यांच्यासाठी ही बातमी खरोखरच भावूक करणारी आहे. अनेकांनी याला 'एका युगाचा अंत' असे म्हटले आहे. MTV चॅनेल्स बंद होण्याबद्दल एकाने म्हटलं, "एक काळ होता, जेव्हा नवीन गाणी शोधण्यात एक वेगळीच मजा होती. आता सर्व काही सहज आणि लगेच मिळतं, पण त्या काळाची मजा काही औरच होती"
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\