पाकिस्तानचा लाळघोटेपणा पाहून मेलोनींच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले; रिएक्शन कॅमेऱ्यात कैद, Video व्हायरल!

    14-Oct-2025   
Total Views |
 
Italy PM Meloni
 
मुंबई : (Italy PM Meloni) सध्या सोशल मीडियावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Italy PM Meloni) यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत. त्यांच्या भाषणादरम्यान मागेच उभ्या असलेल्या इटलीच्या पंतप्रधान मेलोनी (Italy PM Meloni) यांचे हावभावही कॅमेऱ्यात कैद झालेत.
 
हेही वाचा -  Coldrif Cough Syrup बनवणाऱ्या कंपनीला कायमचं टाळं! तामिळनाडू सरकारकडून उत्पादन परवाना रद्द
 
इजिप्तच्या शर्म अल-शेख येथे आयोजित गाझा शांतता शिखर परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची केलेली स्तुती जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली. शरीफ यांनी ट्रम्प यांना 'शांतता प्रस्थापित करणारे' म्हणून गौरव केला आणि भारत-पाकिस्तान संधर्ष थांबवण्यात योगदान दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी शाहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांना पुन्हा नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्याची इच्छा व्यक्त केली.
 
ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता
 
"मला खरंच वाटतं की ते शांतता पुरस्कारासाठी सर्वात खरे आणि सर्वात अद्भुत उमेदवार आहेत. डोनाल्ड ट्रम्प शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष थांबविण्यासाठीही चांगले योगदान दिले. त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता. आम्ही पुन्हा एकदा त्यांना नोबेल मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवू," असं शरीफ म्हणाले. त्यांचे हे विधान ऐकताच त्यांच्या मागे उभ्या असणाऱ्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Italy PM Meloni) यांनी तोंडावर हात ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य व्यक्त करणारे हावभाव पाहायला मिळाले.
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\