मोठी बातमी! सांगलीच्या जागेसाठी उबाठाची काँग्रेसकडे १०० कोटींची मागणी?

    06-Apr-2024
Total Views | 1136

UBT 
 
मुंबई : सांगलीची जागा सोडण्यासाठी उबाठा गटाने काँग्रेसकडे १०० कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मला मिळाली आहे, असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच संजय राऊत यासाठीच सांगली दौऱ्यावर गेले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
नितेश राणे म्हणाले की, "संजय राजाराम राऊत आज सांगली दौऱ्यावर आहे. उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेला उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आणि गाठीभेटी घेण्यासाठी हे महाशय सांगलीच्या दौऱ्यावर असल्याचे चित्र दाखवले जाते. पण मला सकाळी पुण्यातील एका काँग्रेस नेत्याचा फोन आला होता. सांगली लोकसभेची चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्ही मागे घेतो. आम्हाला १०० कोटी द्या असा प्रस्ताव मातोश्रीवरून ठेवण्यात आलेला असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. या प्रस्तावर दबाव टाकण्यासाठी आणि काँग्रेसला झुकवण्यासाठी संजय राऊतांचा सांगलीमध्ये दौरा सुरु आहे."
 
हे वाचलंत का? -  "संज्या राऊत तुझी लायकी किती, बोलतो किती?"
 
"तिकडच्या उबाठाच्या कार्यकर्त्यांना आणि चंद्रहार पाटलांना वाटत असावं की, संजय राऊत आमच्यासाठी आले आहेत. पण खरंतर उद्धव ठाकरे जो व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी ते गेले आहेत. सांगलीची जागा मागे घेण्यासाठी किमान मला १०० कोटी द्या, असा प्रस्ताव उबाठाने ठेवला आहे. ही माहिती खरी आहे की, खोटी याचं उत्तर राऊतांनी किंवा त्यांच्या मालकाने द्यावं," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत अशा मागण्या मान्य करणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर जास्त दबाव टाकण्यात येत आहे. पहिल्या दिवसापासूनच उद्धव ठाकरे आणि कंपनीसाठी निवडणूकीचा प्रवास हा फक्त व्यवहार आणि धंदा राहिलेला आहे. विधानसभा आणि लोकसभेच तिकीट विकायचे आणि स्वत:चे घर चालवायचे हा उद्धव ठाकरेंचा जूना धंदा आहे. याच धंद्याचा भाग हा संजय राऊतांचा सांगली दौरा आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? -  आधी म्हणाल्या अकेला देवेंद्र क्या करेगा! आता म्हणतात, पवारांना संपवण्याचं षडयंत्र
 
"संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत थेट कबुली दिली की, जे आधी वसूली करायचे त्यांना भाजपने घेतले आहे. म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये वसूली व्हायची, हे संजय राऊतांनी देशासमोर स्पष्टपणे कबुल केले आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही उपचाराची गरज नाही, पण त्यांच्यामुळे संजय राऊतांच्या मालकावर आणि त्यांच्या कुटुंबावर वेडं होण्याची पाळी आलेली आहे," असेही नितेश राणे म्हणाले आहेत.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याचा प्रयत्न करा : मंत्री आशिष शेलार

वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याचा प्रयत्न करा : मंत्री आशिष शेलार

‘व्हीपीएफ’च्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे शेलार यांच्या हस्ते उद्घाटन; वनविभागासोबतचा संयुक्त प्रकल्प ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ने (व्हीपीएफ) बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहयोगाने राबविलेल्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे रविवार, दि. १३ जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, ‘एसएफसी इन्व्हार्यमेंटल टेनोलॉजीज’ चे सहसंस्थापक व संचालक संदीप परब हेदेखील उपस्थित असेल. या प्रकल्पाचे कौतुक करत असतानाच ..

‘धनुष्यबाण’ कुणाचा? सुनावणीवेळी काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

‘धनुष्यबाण’ कुणाचा? सुनावणीवेळी काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि अधिकृत पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे.या प्रकरणासंदर्भातील अंतरिम दिलासासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.सूर्यकांत आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सोमवार, दि.१४ जुलै रोजी सुनावणी झाली आहे. या याचिकेत येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काही तात्पुरता दिलासा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121