आधी म्हणाल्या अकेला देवेंद्र क्या करेगा! आता म्हणतात, पवारांना संपवण्याचं षडयंत्र

    06-Apr-2024
Total Views | 169
 
Supriya Sule
 
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे प्रचारक प्रविण माने यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. दरम्यान, यावर आता सुप्रिया सुळे यांनी हे शरद पवारांना संपवण्याचं षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. याआधीही त्यांनी अकेला देवेंद्र क्या करेगा असं वक्तव्यं केलं होतं. मात्र, आता फडणवीसांनी प्रविण मानेंची भेट घेतल्यानंतर हे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
शुक्रवारी इंदापूरमध्ये महायूतीची सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंचे प्रचारक प्रविण माने यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेतली. याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "पवार साहेबांना संपवणे हे एकच भाजपचं स्वप्न आहे. बारामतीत पवारांना संपवण्यासाठी भाजप देशातील सगळे लोकं एकवटत आहे. त्यामुळे हेदेखील शरद पवारांना संपवण्याच्या षडयंत्राचा एक भाग असू शकतो. कारण त्यांना विकासासाठी निवडणूक लढवायची नाही. त्यांना लोकशाहीकडून दडपशाहीकडे देश न्यायचा आहे. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येऊन शरद पवारांना संपवण्याची भाषा केली आहे. त्यामुळे पोटातलं ओठात आलं आहे," असे त्या म्हणाल्या.
 
या भेटीबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "प्रविण माने यांच्याशी माझे जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत. ते अनेकवेळा माझ्या घरी येतात. ते बऱ्याच दिवसांपासून माझ्या मागे लागले होते की, तुम्ही इंदापूरला येता पण माझ्याकडे येत नाही. त्यामुळे मी त्यांना कबुल केलं होतं की, तुमच्याकडे चहा पिण्यासाठी येईन. त्यानुसार मी चहा पिण्यासाठी गेलो होते. ते आमच्यासोबतच आहेत आणि आमचे जुने सहकरीच आहेत," असे ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121