"संज्या राऊत तुझी लायकी किती, बोलतो किती?"

    06-Apr-2024
Total Views | 1890

Sanjay Raut
 
मुंबई : संज्या राऊत तुझी लायकी किती आणि तू बोलतो किती, असा हल्लाबोल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर केला आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. यावर आता प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
प्रसाद लाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, "संज्याला वेळोवेळी सांगूनदेखील समजत नसेल तर त्याला आता वेगळ्या भाषेत समजवावं लागेल. तुझी लायकी किती तू बोलतो किती? कंपाऊंडर संजय राऊत देवेंद्र फडणवीसांवर उपचार करण्याची तुझी लायकी नाही."
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसच्या नेत्यानं राऊतांना दाखवली जागा!
 
"त्यांची उंची पाहता तू त्यांच्याकडे बघितलं जरी तरी चक्कर येऊन पडशील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सकाळी जे बोलतोस ते बंद कर. तुला आणि तुझ्या बॉसला महराष्ट्रातील जनतेने त्यांची जागा दाखवलीच आहे. येणाऱ्या काळात तुझ्यामुळे त्यांची यापेक्षाही वाईट परिस्थिती झालेली दिसेल," असा घणाघात त्यांनी केला आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121