खासदारकी तळ्यात मळ्यात? वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट!
15-Mar-2024
Total Views | 48
वसंत मोरेंनी सामना कार्यांलयात जाऊन संजय राऊत यांच्या भेट घेतली आहे. वसंत मोरेंच्या या भेटीमुळे नविन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई: वसंत मोरेंनी ( vasant more ) सामना कार्यांलयात जाऊन संजय राऊत यांच्या भेट घेतली आहे. वसंत मोरेंच्या या भेटीमुळे नविन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. वसंत मोरे यांनी काल शरद पवार यांचीही भेट घेतली होती. वसंत मोरे यांनी पुण्यातुन लोकसभेची निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्याच अनुशंगाने ते महाविकास आघाडीसोबत समिकरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत अशाही चर्चा सुरु आहेत.
वसंत मोरें यांनी नुकतेच १८ वर्ष ज्या पक्षात काम केले त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुण्यातील नेतृत्वाकडुन गळचेपी होत असल्याच्या कारणावरुन त्यांनी पा निर्णय घेतल्याचं आपल्या पत्रकार परीषदेत सांगितलं होतं. वसंत मोरेंना यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे या तीन पक्षांकडुन प्रवेशासाठी ऑफर देण्यात आल्या होत्या. वसंत मोरेंनी पक्ष सोडण्यापुर्वीच शरद पवार यांची भेटही घेतली होती. आणि आता त्यांनी सामना कार्यालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली आहे.
वसंत मोरे पुणे लोकसभा मतदारसंघातुन निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत त्यासाठी समिकरणे जुळवण्याचा ते प्रयत्न करत असल्याच्या चर्चा आहेत. पुण्यातील राजकिय परिस्थिती पहायची झाल्यास पुण्याची जागा ही काँग्रेस पक्षाकडे आहे. तर बारामतीची जागा शरद पवार गटाकडे आहे जेथे सुप्रिया सुळें उमेदवार असतील.
संजय राऊत आणि शरद पवार यांच्याबरोबरच काँग्रेस पक्षासोबत ही चर्चा झाली असल्याचंही वसंत मोरे यांनी सांगितलं आहे. मी पुण्यातुन लोकसभा लढवण्यावर ठाम आहे. असही त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात काँग्रेसचे मोहन जोशी, अरविंद जगताप आणि रविंद्र धंगेकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
पुण्यातुन महायुतीने भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी घोषित केली आहे. हो मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदारसंघ आहे. येथे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी ३ लाख २४ हजार मतांनी विजय मिळवला होता. आता वसंत मोरेंना महाविकास आघाडी उमेदवारी देणार की ते अपक्ष निवडणुक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.