अभिनेत्रीला लोकसभेचे तिकिट देण्यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्नशील!

नितेश राणे; उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचा दावा

    14-Mar-2024
Total Views |
Nitesh Rane on Aditya Thackeray

मुंबई
: ठाकरे गटाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे एका अभिनेत्रीला लोकसभेचे तिकिट देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दि. १४ मार्च रोजी नितेश राणे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर सूचक पोस्ट केली आहे.

"लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत 'पेंग्वीन ठाकरे' एका अभिनेत्रीला तिकीट देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा मात्र त्याला विरोध आहे. आता उरलेल्या निष्ठावंतांना डावलून 'पेंग्वीन' या अभिनेत्रीला लोकसभेचे तिकीट मिळवून देतो हे बघायचे? अब आयेगा मजा", अशा आशयाची पोस्ट नितेश राणे यांनी केली आहे. दरम्यान, त्यावर उद्धव ठाकरे गटातील एकाही नेत्याने भाष्य न केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.