कट्टरपंथीयांकडून दगडफेक, जाळपोळ, पोलिसांवर हल्ला! बेकायदेशीर 'दर्गा' जमीनदोस्त

    10-Mar-2024
Total Views | 377
 Dargah
 
गांधीनगर : गुजरातमधील जुनागडमध्ये महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. येथे माजेवाडी गेटजवळील वादग्रस्त बेकायदा दर्गा पाडण्यात आला आहे. पाडल्यानंतर रात्री ढिगाराही हटवण्यात आला. ही कारवाई दि. ९-१० मार्च २०२४ च्या रात्री करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी सतर्क राहिले. हा तोच दर्गा आहे जिथे गेल्या वर्षी कट्टरपंथी जमावाने दगडफेक केली होती. या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
 
वृत्तानुसार, हा दर्गा जुनागड शहराच्या मध्यभागी माजेवाडी गेटजवळ बांधण्यात आला होता. ९-१० मार्चच्या रात्री मोठ्या संख्येने प्रशासकीय कर्मचारी येथे पोहोचले. प्रशासनाच्या या पथकात पोलिस कर्मचारी आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा समावेश होता. काही वेळातच बुलडोझर मागवण्यात आला आणि बेकायदेशीर दर्ग्याला जमिनदोस्त करण्यात आला.
 
 
या दर्ग्याचा ढिगाराही मालवाहू वाहनांमध्ये भरून रातोरात हटवण्यात आला. याआधी माजेवाडी गेटजवळ बांधलेला बेकायदेशीर दर्गा पाडण्याचा प्रयत्न जून २०२३ मध्ये झाला होता. या कारवाईपूर्वी नोटीस बजावण्यात आली. तरीही कट्टरपंथी जमावाने त्यावेळी पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात महिला कर्मचाऱ्यांसह अनेक पोलीस जखमी झाले होते. त्यानंतर कट्टरपंथी जमावाने जोरदार दगडफेक केली होती आणि एसटी बसही जाळल्या होत्या. या हल्लात एका नागरिकाचा मृत्यू देखील झाला होता.
 
पोलिसांवर करण्यात आलेल्या हल्लात अनेक महिला आणि अल्पवयीन मुलेही या हल्ल्यात सामील असल्याचा संशय आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून या हिंसक जमावावर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून अनेक हल्लेखोरांना अटक केली. शेवटी हा दर्गा पाडण्यात आला.
 
 
गुजरात सरकार अतिक्रमणाविरोधात कठोर पावले उचलत आहे. अनेक ठिकाणचे अवैध अतिक्रमण काढले जात आहे. दोन दिवसांपूर्वी कच्छमधील खवडा परिसरात तीन बेकायदा मदरसे बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले होते. याशिवाय जामनगर येथील कुख्यात गुन्हेगार रझाक सैचा आणि त्याच्या भावाच्या दोन बेकायदा बंगल्यांवर शुक्रवारी (8 मार्च) प्रशासनाचा बुलडोझर चालवला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121