रामलला प्राणप्रतिष्ठापणा सोहळा! मंत्री लोढा झाले ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार
22-Jan-2024
Total Views |
मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून संपुर्ण देश ज्या क्षणाची वाट बघत होता तो क्षण आज प्रत्यक्षात साजरा होत आहे. अयोध्या येथे रामललाचा प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात झाली असून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील या ऐतिहासिक क्षणात सहभागी झाले आहेत. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
"५०० वर्षांची प्रतिक्षा आज संपली आहे. भारतातील राम आज आपल्या स्थानावर विराजमान होत असून मला आणि माझ्या कुटुंबाला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा बहुमान मिळाला आहे," असे मंत्री मंगलप्रभात लोढांनी फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे.
सोमवारी, अयोध्या येथे राम मंदिर उद्धाटनाचा भव्य सोहळा रंगला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेची विधिवत पुजाअर्चा सुरु आहे. संपुर्ण देश या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनला आहे.