नवी दिल्ली : चीन सरकारने २००५ पासून २०१४ पर्यत काँग्रेसला पैसे दिले होते. त्यामुळे "राहुल गांधीकी नफरतकीं दूकानमें चायनीज सामान!", अशी टीका भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर चीनच्या सहकार्याने भारताविरोधात वातावरण निर्माण केल्याचा आरोप दुबे यांनी केला.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी दावा केला आहे की,न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्रातील एका वृत्तात ईडी रेडचा हवाला देऊन हे उघड झाले आहे की न्यूजक्लिक पोर्टलला भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी चीनकडून पैसे कसे मिळाले आणि हा पैसा नक्षलवादी आणि इतर लोकांपर्यंत कसा गेला. न्यूजक्लिकचा प्रमुख हा देशद्रोही तुकडे-तुकडे गॅगचा सदस्य असल्याचा आरोप खासदार निशिकांत दुबे यांनी केला. भारत संकटात असताना २००५ ते २०१४ या काळात चीन सरकारने काँग्रेसला पैसे दिले , असा आरोप त्यांनी केला. ज्यांचा FCRA परवाना भारत सरकारने रद्द केला होता.
त्याचबरोबर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सभागृहाला डोकलामची आठवण करून दिली. २००८ मध्ये चीनमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आले होते, असा आरोप भाजप खासदाराने केला. २०१७ मध्येही डोकलामच्या वेळी ते चिनी लोकांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस नेत्यांना माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या 'हिंदी चीनी भाई-भाई' धोरणाचा विस्तार करायचा आहे आणि त्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत.
दरम्यान चीनसोबत काँग्रेसला देश उद्ध्वस्त करायचा आहे, असा आरोप खासदार निशिकांत दुबे यांनी केला. लोकसभेत खासदारांच्या गदारोळात ते म्हणाले की, काँग्रेसला चीनकडून मिळालेल्या अनुदानाची सरकारने चौकशी करावी आणि काँग्रेसला निवडणूक लढवल्याबद्दल बेकायदेशीर ठरवावे, अशी मागणी ही खासदार निशिकांत दुबे यांनी केली.