ठाणे कोविड योद्धा

यज्ञ मदतीचा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपत्तीच्या काळात केलेले कार्य ध्यानात घेत मदतकार्याचा आराखडा तयार केला. आ. निरंजन डावखरे यांच्याबरोबरच आ. संजय केळकर यांच्यासह ठाण्यातील २४ नगरसेवक, ११ मंडल अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मदतीच्या यज्ञात सहभागी झाले. त्याविषयी.....

ज्योत एक सेवेची!

आणीबाणीपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले संजय केळकर ठाण्यात दीर्घकाळ भाजपचे काम करत आहेत. ठाण्याच्या सुखदुःखाशी ते एकरूप झाले आहेत. कोरोना संकटात ठाणे आणि ठाणेकरांची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी ते उभे राहिले. ‘आपला माणूस, हक्काचा माणूस’ अशी ओळख असलेल्या ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी कोरोना आपत्तीत केलेल्या कामावर दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख. ..

संकटकाळी जनसेवेसाठी तत्पर

कोरोना व ‘लॉकडाऊन’ काळात गरीब, कामगार व अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहत भाजप नेते व ‘ठाणे गौरव प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, ‘पीपीई किट’, औषध वितरणाची मदत नौपाड्यासह गरजेच्या प्रत्येक ठिकाणी केली. त्यामुळे गरीब-गरजूंना मोठा आधार लाभला. त्यांच्या या कोविडकाळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख... ..

सजग नेतृत्व!

महामारीचे संकट ज्यावेळी अवघ्या देशावर ओढावले होते, त्याचवेळी ठाणे महापालिका क्षेत्रातही कोरोना हातपाय पसरत होता. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसमोर जाऊन सार्‍यांना विश्वासात घेण्याची जबाबदारी ओळखत ठाणे महापालिकेचे नगरसेवक मनोहर जयसिंग डुंबरे यांनी मदतकार्याचा धडाका लावला. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या वाटपावर भर न देता, ते खरोखरी एक ‘कोविड योद्धे’ म्हणून कित्येकांच्या मदतीला धावून गेले. त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा... ..

तत्पर, ऊर्जस्वी ‘कोविड योद्धा!

’ठाणे नगरीतील महान सामाजिक व्यक्तिमत्त्व असलेल्या स्व. अरविंद पेंडसे यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या मृणाल पेंडसे आज कोरोनाच्या काळात एक नगरसेविका म्हणून, एक माणूस म्हणून आणि एक ‘कोविड योद्धा’ म्हणून करत असलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा व्यक्तिमत्त्व असलेल्या नगरसेविका मृणाल पेंडसे म्हणजे तत्पर, ऊर्जस्वी ‘कोविड योद्धा’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या या कार्याचा घेतलेला आढावा. ..

मानव सेवा हीच खरी भक्ती

कोरोनाच्या संकटात सेवाकार्य झाले आहेच. अजूनही गरजेनुसार होत आहे. यथाशक्ती अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय जनता पक्षाचे ठाणे नौपाडा मंडल अध्यक्ष, प्रभाग क्रमांक २१ चे नगरसेवक सुनेश जोशी यांनी पुढाकार घेऊन ‘लॉकडाऊन’च्या पूर्ण कालावधीत नौपाडा परिसरात विविध प्रकारची कामं केली आहेत. ‘कोरोना योद्धा’ होऊन सुनेश जोशी कार्यरत आहेत. नगरसेवक सुनेश जोशी यांनी केलेल्या कार्याचा आढावा... ..

गरजूंसाठी ‘कृष्णाश्रय’

आजच्या युगात यावी, असं काम कृष्णा पाटील आणि नंदा पाटील या ठाण्यातील नगरसेवक दाम्पत्याने कोरोना कालावधीत केले आहे. प्रभागात आरोग्य शिबिरांचा रतीब घालून समाजातील विविध स्तरांतील गरजूंसाठी हे दाम्पत्य सरसावल्याचे दिसून आले. ‘कोविड योद्धा’ ठरलेल्या या दाम्पत्याच्या दातृत्वाचा हा छोटेखानी आलेख. ..

समाजस्नेही जनसेविका

राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले पती रमेश आंब्रे यांची सहचारिणी बनून समाजकारण करत असताना लोकप्रतिनिधी पदाची संधी उपलब्ध झाली अन् भाजपच्या माध्यमातून उच्चभू्र, तसेच गोरगरीबबहुल प्रभागाच्या नगरसेविका बनून जनसेवेचा त्यांनी वसा घेतला. त्यानंतर, सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजस्नेही जनसेविका बनलेल्या स्नेहा रमेश आंब्रे; अर्थात ‘एसआरए’ यांनी ‘कोविड’काळातही आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले. ..

समाजातील सर्व घटकांचा आधारस्तंभ

‘लॉकडाऊन’च्या या कालावधीत समाजातील वंचित घटकांना सहकार्याची, मदतीची आवश्यकता असल्याने अनेक राजकीय, सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे नेते आणि समाजसेवक मदतीसाठी पुढे आले. त्यातीलच एक म्हणजे ठाण्यातील सीताराम राणे होय. ‘कोविड’ काळात ठाणे ते कोकणसह महाराष्ट्रातील सोसायट्या असा सर्वदूर मदतीचा हात देणार्‍या सीताराम राणे या ‘कोविड योद्ध्या’चा आढावा घेणारा हा लेख. ..

‘भरत’ एक लढवय्या कोरोनावीर

स्थानिकांसह परप्रांतीय स्थलांतरित मजुरांसाठी सदैव मदतीचा हात देणारे भाजप नेते तथा ज्येष्ठ नगरसेवक आणि ‘न्यू गावदेवी भाजी मार्केट व्यापारी महासंघा’चे संस्थापक व ‘तारामाउली सामाजिक सेवा संस्थे’चे संस्थापक भरत अभिमन्यू चव्हाण यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, होमियोपॅथिक औषध वितरणाची मदत केली. ‘कोविड’ काळात भरत चव्हाण यांनी केलेल्या या मदतकार्याचा हा सविस्तर आढावा... ..

स्वयंसेवकाचे सेवाव्रत

देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक लागलेला ‘लॉकडाऊन’ आणि सर्वकाही ठप्प झाल्यानंतर आपल्या परीने सर्वसामान्यांना धीर देण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वितरण, भाजीपाला वितरण व मजुरांना अन्नदान करणारे भाजपचे ठाणे शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष श्रीकांत राजपूत. त्यांच्या मदतीमुळे कित्येकांच्या जीवनावश्यक गरजांचा प्रश्न मार्गी लागला. तेव्हा, श्रीकांत राजपूत यांनी कोरोनाकाळात केलेल्या मदतकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख... ..

जनमानसाप्रति अशीही ‘वि’नम्रता

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले समाजसेवक पती जयेंद्र कोळी यांच्या सोबतीने समाजकारणाचे धडे गिरवता गिरवता लोकप्रतिनिधीची धुरा त्यांच्या शिरावर पडली. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका बनल्यानंतर मागे वळून न पाहता जनमानसाप्रति आपली ‘वि’नम्रता त्यांनी सिद्ध करून दाखवली. अशा या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी ‘कोविड’काळात केलेल्या समाजसेवेची ही चित्तरकथा सार्‍यांनाच भावणारी आहे. ..

कोविड काळात आशेचा ‘किरण’

राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना केवळ समाजसेवेची आवड असल्याने लोकप्रतिनिधी बनलेल्या ठाण्यातील भाजप नगरसेविका अर्चना किरण मणेरा यांनी ‘कोविड’ काळात गोरगरिबांसह उच्चभ्रू नागरिकांसाठी फार मोठे कार्य केले. त्यांच्या या मदतीचा अनेक गरजूंना लाभ झाला. त्यामुळे सर्वांसाठीच त्या आशेचा ‘किरण’ ठरल्या. पती डॉ. किरण मणेरा यांच्या साथीने अर्चना यांनी कोरोना कालावधीत केलेल्या कार्याची घेतलेली ही दखल... ..