अर्थकारण

म्हणून मोदींनी नाकारली 'अॅमेझॉन' फाऊंडर बेजोस यांची भेट

अॅमेझॉनचे फाउंडर आणि सीईओ जेफ बेजोस यांच्या भारत दौऱ्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बेजोस यांना भेटण्याची शक्यता आता धूसर आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे, कॉम्पिटीशन कमीशन ऑफ इंडिया (सीसीआय) अॅमेझॉनविरोधात चौकशी करत आहे. ..

डिसेंबरचा जीएसटी महसूल १ लाख कोटींहून जास्त

वस्तू व सेवा करापासून (जीएसटी) सरकारला प्राप्त होणार्‍या महसूलाने डिसेंबर महिन्यात १ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सलग दुसर्‍या महिन्यात महसूल एक लाख कोटींच्या पुढे गेल्याने नव्या वर्षाच्या सुरूवातीस आर्थिक आघाडीवर सकारात्मक घडामोड घडली आहे...

'जेट' पुन्हा उड्डाण घेईल का ?

ब्रिटनचा हिंदूजा समुह बंद पडलेल्या जेट एअरवेज विमान कंपनीला खरेदी करण्यासाठीच्या लिलावात सहभाग घेणार आहे. ..

एअरटेल ग्राहकांसाठी महत्वाची बातमी

भारती एअरटेल नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कॉल दरांच्या किंमतीत वाढ करत आहे. एअरटेलतर्फे सलग दुसऱ्यांदा मोबाईलच्या कॉल रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कंपनीने आपल्या सर्व बेस रिचार्जच्या किंमती बदलून नव्या किंमत आजपासून लागू केल्या आहेत. एअरटेल नेटवर्कसोबत जोडून राहायचे असल्यास किमान ४५ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवसांची असणार आहे. पूर्वी हा रिचार्ज ३५ रुपयांचा होता...

सेन्सेक्सची उसळी; शेअर बाजार तेजीत

सलग तिसऱ्या दिवशीही उच्चांक मोडला.....

सायरस मिस्त्री पुन्हा टाटा समुहाचे अध्यक्ष !

राष्ट्रीय कंपनी लवादाने टाटा समुह व्यवस्थापनाला मोठा दणका दिला आहे. टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्रींना हटवण्यात आलेली प्रक्रीया अवैध ठरवली आहे. त्यांची पून्हा या पदावर नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत. दरम्यान, टाटा समुहाकडे आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे पर्याय खुले आहेत...

पीएमसी घोटाळाप्रकरणी ईडीकडून पहिले आरोपपत्र दाखल

ईडीने सादर केले ७ हजार पानांचे आरोपपत्र..

शेअर बाजाराचा रेकॉर्ड ब्रेक उच्चांक

जीएसटी दरांमध्ये कुठलाही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली. Share Market News..

एनईएफटी सुविधा आता २४x७ उपलब्ध

आरबीआयच्या निर्णयाने ग्राहकांना मोठा दिलासा.....

टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विवेक पत्की; उपाध्यक्षपदी शरद गांगल

देशात सहकार क्षेत्रात सातत्याने आघाडीवर असणाऱ्या टीजेएसीबी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. सदर संचालक मंडळाचा कालावधी २०२० ते २०२५ असा पाच वर्षांसाठी आहे. सी. नंदगोपाल मेनन, सीए विवेक पत्की, रमेश कनानी, ऍड.प्रदिप ठाकूर, दिलीप सुळे, अनुराधा आपटे, मधुकर खुताडे या विद्यमान संचालकांसह डॉ. अश्विनी बापट, शरद गांगल, ऍड. समीर कांबळे, सीए वैभव सिंघवी यांची बिनविरोध निवड झाली आहे...

केंद्र सरकारतर्फे अर्थव्यवस्थेला 'बुस्टर'

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची पत्रकार परिषदेत माहिती..

आर्थिक आव्हाने पेलण्यासाठी बॅंकांनी तयार राहावे : आरबीआय गव्हर्नर

आर्थिक मंदीने अर्थव्यवस्था पिचलेली असून नजीकच्या काळात ही आव्हाने पेलण्यासाठी सज्ज व्हा, असे निर्देश आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बॅंकांना दिले आहेत. येत्या काळात ही परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचेही ते म्हणाले. 'आरबीआय'ने जीडीपीदराचा अंदाज ५ टक्के केला आहे. दुसऱ्या तिमाहीत प्रत्यक्ष जीडीपी ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आला या पार्श्वभूमीवर दास यांचे हे विधान महत्वाचे ठरत आहे. RBI Governor reply to banks on current economy situation ..

सर्वसामान्यांना दिलासा : कांदा होणार स्वस्त

कांदा आयात करण्याचा केंद्राचा निर्णय..

दरवाढी नंतर जिओचे नवीन ऑल इन वन रिचार्ज

रिलायन्स जिओच्या या प्लॅन्समध्ये सुमारे ४०% दरवाढ..

'टीव्ही', 'सेट ऑफ बॉक्स', 'व्हीडीओ गेम्स'सह या वस्तू महागणार

लवकरच टीव्ही, सेट ऑफ बॉक्स, व्हीडीओ गेम्स आणि काजू आदी वस्तूंसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. केंद्र सरकार या मालावरील आयात शुल्क वाढवणार आहे. देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या उत्पदानांना आयात शुल्क लागू करण्याच्या प्रक्रीयेतून वगळ्यात आले होते. त्या वस्तूंनाही या यादीत सामाविष्ठ केले जाणार आहे...

‘पीएमसी’ ग्राहकांना दिलासा

७८% ग्राहकांना पूर्ण ठेव काढण्याची परवानगी..

‘जिओ’चा ग्राहकांना आणखी एक धक्का

ब्रॉडबॅंड सेवेसाठी शुल्क आकरण्यास सुरुवात ..

महा'विकास' आघाडीचा विकासकामांनाच 'ब्रेक'

नवे सरकार विकासविरोधी असल्याचा भाजपचा आरोप..

रिलायन्स कंपनीचा पुन्हा एक नवा विक्रम !

रिलायन्स इंडस्ट्रीज १० लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाची नोंद करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली...

आधारकेंद्रे आता संपूर्ण आठवडाभर

नागरिकांची दिवसेंदिवस वाढती गर्दी लक्षात घेत 'युआयडीएआय'ने देशभरातील आधार सेवा केंद्रे आठवड्यातील सातही दिवस खुली ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला. देशभरातील आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार असून यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या आधी ही केंद्रे मंगळवारी बंद असायची. 'युआयडीएआय'ने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. दररोज एक हजार आधार एन्रोलमेंट किंवा रिक्वेस्ट अपडेट करण्याची या आधार सेवा केंद्रांची क्षमता आहे...

भारतीय अर्थव्यवस्थेत गतीने विकास करण्याची क्षमता : बिल गेट्स

जगातील श्रीमंतांच्या यादीतील अव्वल असणारे मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मोठे विधान केले आहे. 'भारतीय अर्थव्यवस्थेत तेजीने विकास करण्याची क्षमता आहे. त्यामुळे जनतेची गरीबी दूर होण्यास मदत होऊ शकते, त्यासाठी सरकारने आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टींवर जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची गरज आहे.', असे ते म्हणाले. ..

रेल्वेतल्या जेवणासाठी मोजावे लागणार जादा पैसे

राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेसमधील चहा, नाश्ता आणि जेवणाचे दर वाढविण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये तिकीट काढतानाच चहा, नाश्ता आणि जेवणाचे पैसे द्यावे लागतात. ..

छोडेन लेपचा भविष्यात मोठ्या समाजसुधारक बनतील!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे गौरवोद्गार..

सेन्सेक्सचे सिमोल्लंघन सुरूच : निर्देशांकाची नव्या विक्रमाला गवसणी

मुंबई शेअर बाजाराने पुन्हा एकदा नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. सेन्सेक्सने ४० हजार ४८३.२१ इतका उच्चांक गाठला. यापूर्वी हा सर्वाधिक विक्रमाचा आकडा ४० हजार ३२९.२२ इतका होता. शेअर बाजारात दिवाळीनंतर सलग सातव्या सत्रात तेजी दिसून येत आहे. दिवाळीनंतर शेअर बाजार एकदाही घसरण दिसली नाही. सोमवारी सेन्सेक्स १३६.९३ अंशांनी वधारत ४० हजार ३०१.९६ इतक्या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी अद्याप आपल्या विक्रमापासून दूर आहे. निफ्टी सोमवारी ५०.७० अंशांनी वधारत ११ हजार ९४१.३० इतक्या स्तरावर ..

बॅंकांची कामे लवकर उरका ! १२ दिवस बंद राहणार बॅंक

नोव्हेंबरमध्ये तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयच्या (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. या १२ दिवसांत आठ सुट्ट्या आणि चार रविवार यांचा समावेश आहे. या महिन्यात छट पुजा, गुरू नानक जयंती, कन्नड राज्योत्सव, वांग्ला फेस्टिव्हल, कनकदास जयंती, आदी सुट्ट्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या राज्यात बँका बंद राहणार असून या सुट्ट्यांचा महाराष्ट्र राज्यावर फारसा परिणाम पडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला अडचणीचा सामना करावा लागणार नाही...

शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी दिवाळी

सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक..

भारतीय अर्थव्यवस्था लवकरच उभारी घेईल : मुकेश अंबानी

'भारतीय अर्थव्यवस्था सुस्त जरी असेल तरीही येत्या तिमाहीत पुन्हा उभारी घेईल', असा विश्वास उद्योगपती मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. सौदी अरेबिया येथील 'फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह'मध्ये उपस्थितांना संबोधित कराताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर हा कार्यक्रम सुरू आहे. यात मुकेश अंबानी यांच्यासह भारतातील अनेक दिग्गजांचा सहभाग होता. भारतातील अर्थव्यवस्थेबद्द्ल त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते...

'गुगल लोकेशन' सुरू आहे ! वेळीच सावध व्हा !

तुमच्या मोबाईल फोनमध्ये गुगल लोकेशन सुरू आहे का ? कारण गुगल तुमच्याबद्दलची माहिती गोळा करून ती माहिती चोरी केली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियन रेग्युलेटरीतर्फे कंपनीने ग्राहकांचा डेटा चुकीच्या पद्धतीने वापरत असल्याचा आरोप लावला जात आहे. हाच डेटा कंपन्यांना विकला जात असल्याचाही आरोप गुगलवर झाला आहे...

धक्कादायक ! आरबीआयने इतक्या बॅंकांना ठोठावला दंड

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बंधन बॅंकेवर एक कोटींचा दंड ठोठावला आहे. प्रवर्तकांचा हिस्सा ४० टक्क्यांवर न आणल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. बॅंकींग व्यवहार सुरू केल्यानंतर तीन वर्षांत हा हिस्सा ४० टक्क्यांवर आणणे गरजेचे होते. २०१४ मध्ये बॅंकेला परवाना मिळाला होता. २०१५नंतर बॅंकेने संपूर्ण व्यवहार सुरू करण्यास सुरुवात केली...

सुवर्णसाठ्याची कोणतीही विक्री केलेली नाही : आरबीआय

मंदीच्या सावटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारला आर्थिक मदत केल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सुवर्णसाठाही विक्रीला काढल्याच्या वृत्ताचा रविवारी बँकेने इन्कार केला. ‘आरबीआय’ने कोणत्याही प्रकाच्या सुवर्णसाठ्याची विक्री केली नसल्याचे रविवारी स्पष्टीकरण दिले...

नव्या वर्षाचे स्वागत तेजीने !

मुहूर्त सत्रात सेन्सेक्स १९२, निफ्टी ४३ अंशांनी वधारले ..

तुमच्या 'DTH'ची KYC पूर्ण झाली का ?

टेलिकॉम ऑथोरीटी ऑफ इंडिया'तर्फे 'डीटीएच' कनेक्शनसाठी KYC (Know Your Customer) प्रक्रीया बंधनकारक केली आहे. यापूर्वीही बऱ्याच नियमांमध्ये बदल करण्यात आले होते. मात्र, या नव्या नियमावलीमुळे आता तुम्हाला आणखी एक प्रक्रीया पूर्ण करावी लागणार आहे. नव्याने कनेक्शन घेणारे आणि जून्या ग्राहकांनाही आता ही प्रक्रीया पूर्ण करावी लागणार आहे...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : MTNL-BSNL आता एकच कंपनी

दोन्ही कंपन्या बंद होणार या चर्चांना पूर्णविराम..

पीएमसी प्रकरणात सरकारची बाजू मांडणार 'हे' वकील [वाचा सविस्तर]

एकुण ११ संलग्न कंपन्यांचा सदर गुन्हयात संबंध दिसुन येत आहे. ..

अभिजीत बॅनर्जी यांचा पत्रकारांना टोला

नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर संवाद साधताना अभिजीत बॅनर्जी यांनी पत्रकारांना टोला लगावला. अभिजीत बॅनर्जी यांनी मोदींची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते म्हणाले, 'तुमच्या प्रश्नांमध्ये मी आता अडकणार नाही', पंतप्रधान मोदींनी मला सतर्क केले आहे. ते सर्व गोष्टींवर बारकाईने नजर ठेवून असतात, तुम्ही केलेल्या बातम्यांच्या वृत्तांकनांवरही त्यांची नजर असते त्यामुळे मी आता काळजी घेईल, असा टोला त्यांनी पत्रकारांन..

जम्मू-काश्मीर, लडाखमधील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

जम्मू : कलम ३७० लागू केल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दिवाळी भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या आस्थापनांतील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यामुळे आता या वेतन आयोगानुसार लागू होणारे सर्व भत्ते कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. मंगळवारी मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे...

प्रफुल पटेल यांची ईडी चौकशी का ? वाचा नेमके कारण काय ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले होते. दाऊदच्या सहकाऱ्याशी व्यवहार केल्या प्रकरणी त्यांची ईडीतर्फे चौकशीही केली जाणार आहे. त्यानुसार, शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर रोजी प्रफुल्ल पटेल यांची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी झाली. दाऊदचा सहकारी ईकबाल मिर्ची याच्याशी संपत्ती व्यवहार प्रकरणी चौकशी केली जात आहे...

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात 'व्हायब्रंट गोवा' परिषदेचे उद्घाटन

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच व्हायब्रंट गोवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि.१७ ते दि. १९ ऑक्टोबर दरम्यान बांबोळी येथील डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी स्टेडीअम येथे हा तीन दिवसीय कार्यक्रम होणार आहे. जगभरातून सुमारे अडीच हजार प्रतिनिधींचा सक्रीय सहभाग या परिषदेत असणार आहे, अशी माहिती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या परिषदेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले...

पीएमसी बॅंकेच्या ग्राहकांवर अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री

पीएमसी बॅंक खातेधारकांना आता सहा महिन्यांत ४० हजार रुपये इतकी रक्कम काढता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २५ हजार रुपये इतकी होती. वित्तीय अनियमिततेच्या प्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवर निर्बंध आणले होते. यानंतर केवळ एक हजार रुपये प्रत्येक खातेधारकाला काढण्याची मुभा होती. ती मर्यादा आता ४० हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे...

भारतीयांसाठी अभिमानास्पद ! अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार जाहीर

जागतिक दारिद्र निर्मूलनासाठी कार्यरत असणारे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. फ्रान्स अर्थतज्ज्ञ इस्टर डफ्लो आणि अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे...

मिनिटाला ६ पैसे : नेटीझन्सनी जिओला केले ट्रोल

या कारणासाठी जिओकड़ून शुल्कआकारणी..

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

केंद्र सरकारने बुधवारी केंद्र १ कोटी १० लाख सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय कॅबिनेटने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्ता (DA) हा पाच टक्के इतका वाढणार असल्याने सद्यस्थितीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ९०० ते १२ हजार ५०० इतकी वाढ होणार आहे...

आरबीआयकडून २६ बिगर बॅंकींग संस्थांची नोंदणी रद्द

या' संस्थांवर कारवाई ..

पीएमसी बॅंक प्रकरण : ग्राहकांना आता १० हजार काढता येणार

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पंजाब महाराष्ट्र कॉर्पोरेशन बॅंकेच्या (पीएमसी) खातेधारकांसाठी दिलासा दिला आहे. नव्या निर्देशांनुसार, खातेधारकांना आता दिवसाला १० हजार रुपये खात्यातून काढता येणार आहेत. या सवलतीमुळे ६० टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातील पूर्ण रक्कम काढून घेता येणार आहे...

जुलैमध्ये १४.२४ लाख नवीन रोजगार

देशभरात जुलै महिन्यात एकूण १४.२४ लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याची आकडेवारी कर्मचारी राज्य विमा निगमतर्फे (ESIC) जाहीर करण्यात आली आहे. देशातील ताज्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये १२.४९ लाख नव्या नोकऱ्या जाहीर झाल्या होत्या. राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने प्रसारित केलेल्या एका अहवालानुसार, २०१८-१९मध्ये ईएसआयसीसह एकूण १.४९ कोटी नोकरदारांची नोंदणी झाली आहे...

विनाकागदपत्रे वाहन चालवल्यास आता दंड नाही !

डिजिलॉकर आणि मोबाईल नसल्यासही पोलीस तपासणार कागदपत्रे ..

कपिल पाठारे यांना बॉल्सब्रिज युनिव्हर्सिटीकडून "डॉक्टरेट इन ‍बिझनेस'ची पदवी

व्हीआयपी क्लोदिंग लिमिटेडचे संचालक कपिल पाठारे यांना त्यांच्या व्यवसाय व औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बॉल्सब्रिज युनिव्हर्सिटीकडून 'मानद डॉक्टरेट इन बिझनेस' ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रथितयश व्यावसायिक आणि लेखक असलेल्या कपिल यांना व्यवसाय आणि छोट्या व्यवसायांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर प्रसार करून नेल्याबद्दल एंटरप्राईजेस एडिशन २०१९ मध्ये ग्लोबल लीडर्स ॲवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले...

दोन वर्षांत सर्व बसेस होणार इलेक्ट्रीक : गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रोनिक वाहनांशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. दोन वर्षात देशभरातील सर्व बसेस इलेक्ट्रीक होणार असल्याचे ते म्हणाले. नॅशनल कॉनक्लेव्ह इन मायक्रो, स्मॉल एण्ड मीडियम एंटरप्रायझेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते...

एसबीआयच्या ग्राहकांना मिळणार 'हा' फायदा

देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एसबीआयने सणासुदीनिमित्त ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. एसबीआयतर्फे गृहकर्ज, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना दिल्या जाणाऱ्या कर्जासह सर्व किरकोळ कर्जांना रेपो रेटशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांना मिळणार आहे. १ ऑक्टोबरपासून नवे व्याजदर लागू केले जातील...

लोढा समूहातर्फ पाच महिन्यांत तीन हजार कोटींच्या सदनिकांची विक्री

मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रात १५ टक्क्यांची हिस्सेदारी वाढली ..

मोदी सरकारची सर्वात मोठी कारवाई : २२ भ्रष्ट्राचारी कस्टम अधिकारी सेवेतून बडतर्फे

मोदी सरकारची सर्वात मोठी कारवाई : २२ भ्रष्ट्राचारी कस्टम अधिकारी सेवेतून बडतर्फ..

'सर्वच क्षेत्रात मंदी नाही !' एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांचा दावा

'जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असेल तर भारतावर त्याचा परिणाम होणे सहाजिक आहे. वाहन उद्योगात सध्या मंदीचे वातावरण आहे. मात्र, त्यामुळे सर्व क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याचे म्हणणे चुकीचे आहे,' असे मत एसबीआयचे रजनीश कुमार यांनी व्यक्त केले. भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक असल्याने जागतिक पातळीवर घडामोडी घडल्या तर त्याचा परिणाम होणे सहाजिक आहे, असेही ते म्हणाले...

१ सप्टेंबरपासून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना १० हजारांचा दंड

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती ..

ई-वाहनांना प्रोत्साहन : 'ही' कंपनी करणार भारतात गुंतवणूक

ई-वाहनांना प्रोत्साहन : 'ही' कंपनी करणार भारतात गुंतवणूक ..

'आय टेन' आता नव्या रुपात

'आय टेन' आता नव्या रुपात..

अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

जगभरातील अनेक अर्थव्यवस्थांचा ढासळता आलेख आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सातत्याने होणारा परिणाम टाळण्यासाठी मोदी सरकार मोठ्या बदलांच्या तयारीत आहे...

मुंबई-दिल्ली रेल्वे प्रवास : आता १६० किमी वेगाने

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मुंबई-दिल्ली रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने नुकताच महत्त्वाचा निर्णय घेतला. या दोन प्रमुख शहरांतील रेल्वे प्रवास १० तासांपेक्षा कमी वेळेत करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात ६८०६ कोटींच्या रेल्वे प्रकल्पास मंजुरी दिली...

एप्रिल-जून तिमाहीतील निर्यातीत ३.१३ टक्क्यांनी वाढ

चालू आर्थिक वर्षात भारताची निर्यात १८१.४७ अब्ज डॉलर्स (१२.९५) रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ ३.१३ टक्क्यांनी जास्त आहे. ..

म्युच्युअल फंड क्या है? (भाग १)

मागच्या पंधरवाडयात आर्थिक तसेच राजकीय पटलावर अनेक घडामोडी झाल्या. सिसीडीचे प्रवर्तक सिद्धार्थ यांचा गूढपणे झालेला मृत्यू. त्याबद्दल समाज माध्यमांवरून आलेल्या सरकारी धोरणांवर सूचना वजा टीका पासून आयुष्यात मित्र किती महत्वाचे असतात इथपर्यंत...

नवी बुलेट १ लाख १२ हजारांत : ९ ऑगस्टपासून बुकींग सुरू

रॉयल एनफिल्‍डने आयकॉनिक रॉयल एनफिल्‍ड बुलेटच्‍या सहा नवीन व्‍हेरिएण्‍ट्ची घोषणा केली आहे. बुलेट आता १,१२,०००/- रूपये (एक्‍स-शोरूम) इतक्‍या किंमतीमध्‍ये उपलब्‍ध असणार आहे. भारतात जवळपास ९३० डीलर्स टचपॉइण्‍ट्स, ८८०० अधिक सर्विस बेज आणि नऊशेहून अधिक अधिकृत सर्विस वर्कशॉप्‍ससह रॉयल एनफिल्‍डचे देशातील प्रीमिअम ब्रॅण्‍ड्समध्‍ये सर्वात व्‍यापक विक्री व सेवा नेटवर्क आहे. ..

सारस्वत बॅंकेतर्फे पूरग्रस्तांना एक कोटींची मदत

राज्यातील पूरग्रस्तांसाठी विविध व्यक्ती आणि संस्थांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. राज्यातील पूरस्थिती आणि पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदत म्हणून सारस्वत बॅंकेतर्फे मुख्यमंत्री साहाय्यता निधीला एक कोटींची मदत करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, नाशिक, कोकण व अन्य जिल्ह्यात पूरस्थिती ओढवली होती...

जम्मू काश्मिरमध्ये प्रॉपर्टी बाजारात उत्साह

कलम ३७०' आणि 'कलम ३५ अ' रद्द झाल्यानंतर देशभरातून काश्मिरमध्ये खरेदीदार जमीनींचे व्यवहार करण्यासाठी उत्सूक आहेत...

मार्च २०२३मध्ये धावणार देशातील पहिली 'रॅपिड ट्रेन'

मार्च २०२३मध्ये धावणार देशातील पहिली 'रॅपिड ट्रेन'..

या कंपन्या 'CCD' खरेदी करण्यास उत्सूक

'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक आणि अध्यक्ष व्हि. जी. सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर कंपनी विक्री करण्याची प्रक्रीया वेग घेत आहे. ..

एक व्यावसायिक म्हणून अपयशी ठरलो...! - व्हि.जी. सिद्धार्थ

सीसीडीचे मालक व्हि. जी. सिद्धार्थ यांच्या पत्राने खळबळ..

आता बिनधास्त काढा इतर बॅंकांच्या एटीएममधून पैसे !

पुढील महिन्यात होणार 'हा' बदल ..

एसबीआय खातेधारकांसाठी महत्वाची बातमी : १ ऑगस्टपासून लागू होणार नवे व्याजदर

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) जमा रक्कमेवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात केली आहे. रेपो दरातील घट आणि रोख चलनातील टंचाई यामुळे बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. एसबीआयतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्याजदरातील ५०-७५ आधार अंकांनी कमी केली आहे. दिर्घकालीन मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये २० आधार अंकांची कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २ कोटींहून अधिक ठेवींवरील रक्कमेतही पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळणार आहे...

व्हॉटस्अॅपद्वारेही करता येणार पैसे ट्रान्सफर

नवी दिल्ली : व्हॉटस्अॅप अध्यक्ष विल कॅथकार्ट यांनी भारतात वर्षअखेरीस पेमेंट सेवा सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. कॅथकार्ट सध्या भारताच्या दौऱ्यावर असून गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. व्हॉटस्अॅपतर्फे पेमेंट सेवा अतिशय सुल..

रात्रपाळीला बोलावण्यापूर्वी घ्यावी लागणार कर्मचाऱ्याची परवानगी

कर्मचाऱ्यांची सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थिती संहिता विधेयक २०१९ लागू केले जाणार आहे. त्यानुसार, महिलांना रात्रपाळीला कामावर ठेवण्यापूर्वी त्यांची परवानगी आवश्यक असणार आहे. ..

बॅंकेत रक्कम भरण्यासाठी ‘आधार’ आवश्यक

: बाजारातून चलनी नोटा कमी करणे व डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आता बॅंकांमध्ये विशिष्ट रक्कम भरणा करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक करण्यात येणार आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अशा पडताळणीसाठी आधार क्रमांक नोंदणीकृत असलेल्या क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (OTP) देण्यात येईल, अशी तरतूद करण्यात येणार आहे...