विज्ञान तंत्रज्ञान

'Google For India' सोहळा संपन्न : वाचा भारतीयांसाठी काय अभिमानास्पद !

गुगलने आज 'Google For India' या कार्यक्रमात कित्येक सेवांचा शुभारंभ केला. भारताला समोर ठेवूनच या सेवा सुरू करण्यात येणार आहेत. यात डिजिटल पेमेंट, व्हॉइस असिस्टंट, टुल्स, नोकरी शोधणारे अॅप, अशा सेवांची घोषणा करण्यात आली. व्यापाऱ्यांसाठी बिझनेस गुगल पे लॉन्च करण्यात आले आहे. गुगल पेनुसारच युपीआयच्या मदतीने हे अॅप काम करणार आहे. सध्या गुगल पेचे सहा कोटी युझर्स आहेत...

इस्त्रोकडून सुखद वार्ता : विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुस्थितीत उभा

चांद्रयान-२ संदर्भात आता आणखी एक सुखद वार्ता इस्त्रोने दिली आहे. गेले दोन दिवस या मोहिमेवर लक्ष ठेवून असणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "विक्रम लँडर नियोजित ठिकाणी उभा आहे. त्याचे कोणतेही नुकसान झालेले नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर थोडे तिरक्या स्थितीत उभे असलेल्या या लँडरशी पुन्हा संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत."..

दीड वर्षात एस-४०० क्षेपणास्त्र भारताच्या ताफ्यात

रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरीसोव यांनी रविवारी केलेल्या घोषणेनुसार, 'एस-४००' क्षेपणास्त्र भारताकडे नियोजित वेळेत सोपवले जाईल. बोरिसोव यांनी एका प्रसिद्धीमाध्यमाला दिलेल्या माहितीत म्हटले की, भारताने या करारातील सर्व रक्कम सुपूर्द केली आहे. येत्या दीड वर्षात हे क्षेपणास्त्र भारताकडे देण्यात येईल. गेल्या वर्षी ५ ऑक्टोबर रोजी द्विपक्षीय बैठकीत हा करार करण्यात आला आहे. भारताने रशियासोबत एकूण ५.४३ अब्ज डॉलरचा करार यावेळी केला होता...

सॅमसंग गॅलेक्सी 'नोट १०' आणि 'नोट प्लस' भारतात लॉन्च

सॅमसंगने भारतात गॅलेक्सी नोट १० (Galaxy note 10) आणि गॅलेक्सी नोट १० प्लस (Galaxy 10 PLUS) लॉन्च केला. यापूर्वी जागतिक बाजारपेठेत हा फोन उपलब्ध होता. भारतात याची किंमत कीती, असेल याबद्दल साऱ्यांना उत्सूकता होती. बेंगळुरू येथील ओपेरा हाऊस येथे हे दोन्ही फोन लॉन्च करण्यात आले...

गुगलवर भिकारी सर्च केल्यावर दिसतोय 'हा' फोटो

'गुगल' सर्च इंजिनवर सध्या 'भिकारी' शब्द टाइप करताच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो दिसत आहे...

पाकिस्तानी नेटीझन्सचा तीळपापड : सुरू केला अनसबस्क्राइब ट्रेंड

पाकिस्तानी नेटीझन्सचा तीळपापड : सुरू केला अनसबस्क्राइब ट्रेंड..

…तर टिक टॉक, हॅलो होणार बंद !

सोशल मीडियावर अनेकांच्या गळ्यातील ताईत असणारे टिक टॉक आणि हेलो हे दोन्ही अॅप पुन्हा एकदा वादाचा मुद्दा बनले आहेत...

'या' कारणासाठी चांद्रयान मोहीम थांबवली

रविवारी रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी रॉकेट 'जीएसएलव्ही'-'एमके' तृतीय यानात 'क्रायोजेनिक स्टेज'वर द्रवस्वरूपात ऑक्सिजन भरण्यात आला होता. रात्री १ वाजून ४ मिनिटांनी 'चांद्रयान-२'ला नेणाऱ्या जीएसएलव्ही रॉकेटच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये लिक्विड हायड्रोजन भरण्याचे काम पूर्ण झाले होते. मात्र, २ वाजून १३ मिनिटांनी तांत्रिक कारणांमुळे काउंटडाउन थांबवण्यात आले...

भारतासाठी ऐतिहासिक क्षण ! उद्या झेपावणार 'चांद्रयान-२'

भारताच्या बहुप्रतीक्षित 'चांद्रयान-२' मोहिमेचा मुहूर्त शनिवारी अखेर जाहीर करण्यात आला. सोमवारी मध्यरात्रीनंतर २ वाजून ५१ मिनिटांनी 'चांद्रयान-२' अंतराळात झेपावणार असल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी केली...

सावधान ! अडीच कोटी मोबाईल फोन्सवर व्हायरस हल्ला

तुम्ही अॅण्ड्रॉईड फोन वापरत असाल, तर सावध व्हा. भारतासह अनेक देशांतील अडीच कोटी युझर्सच्या मोबाईलवर मालवेअर हल्ला झाल्याची बाब नुकतिच उघड झाली आहे. इस्रायली सायबर सिक्योरिटी रिसर्च कंपनीतील चेक पॉइंटद्वारे ही माहीती देण्यात आली आहे. हा घातक व्हायरस भारतासारख्या विकसनशील देशांवर हल्ला करत आहे. ..

फेसबुकतर्फे 'लिब्रा' क्रिप्टोकरन्सीची घोषणा

सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप अशी ओळख असलेल्या फेसबुकने आभासी चलन 'लिब्रा'ची घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात हे चलन बाजारात आणले जाणार आहे. ही घोषणा केल्यानंतर बिटकॉईन किंवा इतर आभासी चलनांसारखे कमी अधिक मुल्य असणारे हे चलन नसेल, असेही अधोरेखित केले आहे. जगभरातील फेसबुक युझर्स यापूर्वीच गोपनियतेच्या मुद्द्यावरून चिंतेत आहेत. त्यानंतर फेसबुकतर्फे यासाठी उपाययोजनाही आणण्यात आल्या होत्या. आता आभासी चलनामुळे फेसबुककडे पुन्हा एकदा त्याच नजरेने पाहीले जाऊ शकते, त्यामुळे फेसबुकतर्फे आधीच हे स्पष्टीकरण देण्यात ..

केंद्र सरकारचा अमेरिकेला झटका : डाटा स्टोरेज संदर्भात समिक्षण करणार

केंद्र सरकार अमेरिकेला एक झटका देण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी स्थानिक स्तरावरील डाटा स्टोरेजशी निगडीत नियमावलीं संदर्भात परदेशी कंपन्यांना असलेल्या समस्यांवर विचार केला जाऊ शकतो...

इस्त्रो करणार ऐतिहासिक कामगिरी ! भारताकडे असेल स्वतःचे 'स्पेसस्टेशन'

भारताकडे आता स्वतःचे स्पेस स्टेशन असेल, असा विश्वास इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी व्यक्त केला आहे...

इंग्रजी शिकवणार हे गॅजेट : जाणून घ्या किंमत

नवनवीन तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या शाओमीने खास गॅजेट बाजारात आणले आहे. नव्या गॅजेटद्वारे तुम्ही इंग्रजी भाषा शिकू शकता. 'शाओमी इंग्लिश टिचिंग' हे स्मार्ट असिस्टंटद्वारे कार्यान्वित केले जाते. या गॅजेटची स्क्रीन चार इंची असल्याने हाताळण्यास सुलभ आहे. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. ..

'मिशन मून'साठी 'चंद्रयान २' सज्ज

भारतीय अंतराळ संशोधन संस्थातर्फे (इस्त्रो) 'चंद्रयान २' मोहिमेवर पाठवण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे. 'चंद्रयान २' पाठवण्यासाठी करण्यात आलेली अंतिम चाचणीही यशस्वी झाली आहे. तमिळनाडू येथील महेंद्रगिरी येथे हे परिक्षण करण्यात आले होते...

'जेसीबी'ने मानले भारतीयांचे आभार : जाणून घ्या जेसीबी कंपनीविषयी

'हॅशटॅग जेसीबी की खुदाई'ने #JCBkiKhudai सोशल मीडियावर गेले काही दिवस नुसता धुमाकूळ घातला आहे. हैदराबाद येथे एका खासदाराने भारतीय लोकांकडे बराच वेळ असून जेसीबीचे खोदकाम सुरू असेल तेव्हा ते बघायला गर्दी होत असते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर जेसीबीकी खुदाई हा ट्रेण्ड सुरू झाला. याबद्दल आता जेसीबी कंपनीनेही भारतीयांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. ..

गुगल ट्रेंड : कोण आहे 'ती' पिवळ्या साडीतील महिला ?

नलिनी सिंह यांचे नाव परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर सर्च करण्यात आले आहे. गुगल ट्रेंडमध्ये जागतिक डाटानुसार, या महिलेला नलिनी सिंह या नावाने त्रिनिदाद एंड टोबैगो, हंगरी न्यूजीलॅड, जर्मनी, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, स्विट्जरलॅड, सिंगापुर, चिली, स्पेन, फिलीपींस, मलेशिया, पोलैंड आदी देशातूनही सर्च करण्यात आले आहे. अनेक नेटीझन्सनी त्यांचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे का याबद्दलही शोध घेतला आहे. काहींनी त्या टिकटॉकवरही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे...

आसुसची 'बॅक टू स्कूल ऑफर'

‘बॅक टू स्कूल’ ऑफरमध्ये आसुसच्या कॉम्पॅक्ट लॅपटॉपवर ग्राहकांसाठी सुलभ ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर व्याज मुक्त ईएमआयसह सादर करण्यात आली असून यात दोन वर्षांपर्यंत वॉरंटी मिळवता येणार आहे...

अवकाशामधून धोका जाणवत असल्यामुळेच अॅण्टिसॅटेलाईट चाचणी

भारताला अवकाशामधून धोका जाणवत असल्यामुळेच त्यांनी अॅण्टिसॅटेलाईट किंवा उपग्रह विनाशक क्षेपणास्त्राची चाचणी केली असावी असे सांगत अमेरिकेच्या पेंटागॉनने भारताची बाजू घेतली आहे. मार्च २७ रोजी भारताने उपग्रह विनाशक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आणि असा मान मिळवणारा अमेरिका, रशिया व चीननंतरचा चौथा देश ठरला...

'मिशन शक्ती'मुळे अमेरिका चिंतेत

अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणार्‍या क्षेपणास्त्र (ए-सॅट) चाचणीच्या यशानंतर आता यावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. ‘मिशन शक्ती’द्वारे तिनशे किमी अंतरावरील उपग्रह टीपत जगात अशी कामगीरी करणाऱ्या देशांमध्ये जाऊन बसला, अशी क्षमता असणारा भारत चौथा देश आहे. ..

www @ 30 विशेष : गुगल डुडलतर्फे सन्मान

www अर्थात world wide web ला आज ३० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ‘गुगल’ने एक आगळेवेगळे ‘डुडल’ बनवून www चा अनोखा सन्मान करण्यात आला आहे. ब्रिटिश इंजिनिअर आणि संगणक शास्त्रज्ञ टीम बर्नर ली यांनी मार्च १९८९ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड वाईड वेबचा प्रस्ताव तयार केला. ..

ऑनलाईन रिटेल कंपन्यांची विक्री घटली

ई-कॉमर्स क्षेत्रातील नव्या नियमांमुळे अॅमेझॉनने त्यांच्या सर्वात मोठा विक्रेत्या क्लाऊडटेलला पुन्हा वेबसाईटशी जोडले आहे. ऑनलाईन बाजारपेठेतील दिग्गज कंपनी अॅमेझॉनने यासाठी अंतर्गत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे...

जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी रात्री प्रक्षेपित केलेले ‘मायक्रोसॅट’ आणि ‘कलामसॅट’ हे दोन उपग्रह नियोजित कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावले आहेत. पीएसएलव्ही-सी ४४ या प्रक्षेपकाद्वारे हे उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले...

चंद्रावर कापूस उगवला हो SSS

चंद्रावरचे पहिले पाऊल मनुष्याने ठेवले आणि इतिहास घडला. अनेक देशांनी आजवर चंद्रयान मोहिमा यशस्वी रित्या पार पाडल्या आहेत..

अडीच हजार किलोच्या जीसॅट-७ संपर्क ग्रहाचे आज प्रक्षेपण

तामिळनाडूतील इस्रोच्या श्रीहरीकोट्टा अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून बुधवारी 'जीसॅट-७ए' हा संपर्क उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे..

'इस्रो'ने यासाठी प्रक्षेपित केला हा उपग्रह

: जगातील अवकाश संशोधन क्षेत्रात आघाडीची संस्था म्हणून ओळख असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. इस्त्रोने गुरुवारी सकाळी ‘पीएसएलव्ही-सी-४३’ प्रक्षेपकाद्वारे एकावेळी तब्बल ३१ उपग्रह अवकाशात सोडले...

मंगळ ग्रहावर पाणी वैज्ञानिकांचा नवा शोध

मंगळ ग्रहावर द्रव स्वरुपात पाणी असल्याचा शोध वैज्ञानिकांनी नुकताच लावला आहे. पाण्याचे अस्तित्व मंगळ ग्रहावर असून हे पाणी जमिनीच्या आत सरोवरच्या स्वरुपात आहे असे म्हणण्यात आले आहे...

गुगलवर ‘इडियट टाईप’ करा पहा कोण येत ते?

गुगलवर तुम्ही कधी ‘इडियट टाईप’ केले आहे काय? नसेल केले तर आता करून पहा आणि पहा तर तुमच्या मोबाईल आणि संघणकाच्या पटलावर काय येत ते? गुगलवर इडियट टाईप’ केल्यावर चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दाखवितात...

डेटा लिक प्रकरणी फेसबुककडून तब्ब्ल २०० ऍप्सवर कारवाई

गेल्या तीन महिन्यांच्या काळामध्ये फेसबुकने एकूण ५८३ मिलियन म्हणजे ५८.३ कोटी फेक अकाउंट्स बंद करण्यात आल्याचे फेसबुकने जाहीर केले आहे...

२०२० मध्ये मंगळावर पहिले हेलिकॉप्टर नासा पाठवणार

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘नासा’ लवकरच मंगळावर हेलिकॉप्टर पाठवणार असून ही माहिती नासाने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केली आहे...

जेव्हा उपग्रह परग्रहावर उतरतो...

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘नासा’ ने नुकताच एक व्हिडीओ आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे...

मंगळ शोधासाठी नासा घेणार आणखी एक झेप

प्रेक्षपणानंतर येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये हा यंत्रमानव मंगळाच्या भूमीवर उतरेल..

ट्वीटरकडून आदेश, त्वरित बदला आपल्या ट्वीटर अकाऊंटचे पासवर्ड

ट्वीटरने नुकतेच आपल्या युजर्सना सुरक्षिततेसंदर्भात काही महत्वाचे आदेश दिले आहे. लवकरात लवकर आपल्या ट्वीटर अकाऊंटचे पासवर्ड बदला असे आदेश ट्वीटरने आपल्या युजर्सना दिले आहेत...

....आणि केंब्रीज अ‍ॅनालिटिका पडली बंद

कंपनीने जो डेटा मिळवला होता तो देखील कायदेशीररित्या गैरमार्गाने मिळविलेला असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर यामुळे अनेक देशांतील निवडणुका प्रभावित झाल्याचे देखील समोर आले होते...

परग्रहावर जीवन शोधण्यासाठी नासाची मोहीम आजपासून सुरु

‘ट्रांसपोर्टिंग एक्सोप्लेनेट सर्वे सैटलाइट’ अर्थात ‘टेस’ नामक उपग्रहाचे प्रक्षेपण आज अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने केले आहे...

रशियन कंपनी असलेल्या 'टेलिग्राम'वर रशियामध्येच बंदी

व्हॉट्सअॅपचा प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'टेलिग्राम' या मेसेंजर अॅपवर रशियन न्यायालयाने बंदी घातली आहे. ..

भारतीय निवडणुकांच्या वेळी काळजी घेऊ

२०१८ हे अमेरिकेबरोबरच जगभरातील अनेक देशांच्या निवडणुकांच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचे वर्ष असल्याचे मार्कने म्हटले...

सर्व गोष्टींना मीच जबाबदार : मार्क झुकेरबर्ग

फेसबुक मी निर्माण केले आहे, तसेच त्याचे संपूर्ण कार्य देखील मीच पाहतो. त्यामुळे फेसबुकसंबंधी सध्या जे काय झाले आहे. त्याला मीच जबाबदार आहे' अशी कबुली त्याने दिली आहे. ..

५ लाख भारतीयांचा डेटा कॅम्ब्रीज अॅनालिटीकाला झाला शेअर; फेसबुकचा गौप्यस्फोट

या यादीत भारताचा ७ वा क्रमांक लागत असून, एकूण ५ लाख ६२ हजार ४५५ एवढे भारतीय नागरिकांचे खाते सामील आहेत...

यूट्यूबच्या मुख्यालयावर हल्ला

अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील यूट्यूबच्या कार्यालयावर एका महिलेने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे...

फेसबुक डाटा लिक : मार्क झकरबर्गचा माफीनामा

झकरबर्गने आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्याने डाटा लिक झाल्याचे मान्य केले आहे. ..

प्रसिद्ध खगोल वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचे निधन

इंग्लंडमधील कॅम्ब्रिज येथील त्यांच्या राहत्या घरी आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ..

पीएच.डी. पदवीधारकांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर

पीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्या देशात भारत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असला तरी, विकसनशील आर्थिक देशात भारताचा क्रमांक अव्वल ठरला आहे...

अमेरिकी अंतराळवीर जॉन यंग यांचे निधन

चंद्रावर पाऊल ठेवणारे अमेरिकेचे अंतराळवीर जॉन यंग यांचे नुकतेच निधन झाले. या बाबत नॅशनल अॅरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाने माहिती दिली. जॉन यंग यांचा आपोलोच्या पहिल्या अंतराळ शटल मोहिमेत मह्त्वाचा सहभाग होता. ते ८७ वर्षाचे होते...

नासा पाठवणार मंगळावर आणखीन एक रोबोट

२०१२ मध्ये नासाने मंगळावर पाठवलेल्या क्युरीआसटी या रोबोटचा कार्यकाळ २०२० मध्ये संपत आहे, त्यानंतर लगेच नासाकडून क्युरीआसटी-II हा नवीन रोबोट मंगळावर पाठवण्यात येणार आहे. ..

धार्मिकता बाजूला ठेवत योगाला सौदी अरेबियात क्रीडा प्रकार म्हणून मान्यता

सौदी सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने आज त्याची अधिकृत घोषणा केली. त्यात नमूद केले आहे की, ज्यांना योग शिकायचे अथवा शिकवायचे आहे ते सरकारमान्य परवाना मिळवून अधिकृतपणे योग शिकू शकतात. ..

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थॅलेर यांना नोबेल पुरस्कार जाहीर

'वर्तणुकीशी अर्थशास्त्र' यातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे रॉयल स्वीडिश अकादमीने जाहीर केले आहे...

व्हॉट्स अॅपचे नवे इमोजी....

नवीन इमोजी डिझाईन सध्या बीटा व्हर्जन २.१७.३६३ केवळ अॅन्ड्रॉईडसाठी उपलब्ध आहे. ..

'क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी' संशोधनाला रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर

शास्त्रज्ञ जॅक्स डबचेट, जोशिम फ्रँक आणि रिचर्ड हेन्डरसन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल...

गुरुत्वाकर्षण लहरी संशोधनाला भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर

रेनर वीस, कीप थ्रोन, आणि बॅरी बरीश असे या तीन वैज्ञानिकांचे नाव आहे...

आज गुगलचा १९ वा वाढदिवस

जगप्रसिद्ध सर्च इंजीन मानल्या जाणाऱ्या गुगलचा आज १९ वा वाढदिवस आहे. यानिमित्त गुगलने आपल्या चाहत्यांसाठी खेळ तयार केला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या या खेळांमध्ये चाहते चांगलेच रमलेले दिसत आहेत...

आता ट्विटरचा संदेश २८० अक्षरांचा

ट्विटरने स्वतः याविषयी माहिती दिली असून यासाठी प्रारंभिक तत्वावर काही चाचण्या घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगतिले आहे. ट्विटरने यासंबंधी एक भलेमोठे ट्वीट केले आहे...

नासाच्या ‘केसिनी-ह्युजेन्स’ यानाचा प्रवास संपुष्टात

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने २० वर्षांपूर्वी अवकाशात प्रक्षेपित केलेल्या ‘केसिनी-ह्युजेन्स’ हे अंतराळयान काल शनी ग्रहावर आदळले आहे. १९९७ साली नासाने हे यान अंतराळ कक्षेत सोडले होते त्यानंतर तब्बल सात वर्षांनी म्हणजेच २००४ मध्ये हे अंतराळयान शनी ग्रहावर जावून पोहोचले. हे यान शनीवर आदळण्यापूर्वी शनी ग्रहाची छायाचित्रे पाठवली होती. लाखो डॉलर खर्च करून हे यान शनीवर पाठवण्यात आले होते. ..

डिजिटल प्रशासन हे प्रामाणिक आणि पारदर्शी प्रशासन : रवी शंकर प्रसाद

डिजिटल प्रशासन प्रामाणिक आणि पारदर्शी प्रशासन निर्माण करण्यास मदत करते असे मत कायदा व न्याय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी व्यक्त केले आहे...

नासाचे ‘केसिनी-ह्युजेन्स’ यान आज शनीवर आदळणार

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने २० वर्षांपूर्वी अवकाशात प्रक्षेपित केलेल्या ‘केसिनी-ह्युजेन्स’ हे अंतराळयान आज शनी या ग्रहावर आदळणार आहे. ..

आयफोनचा थक्क करणारा नवीन मॉडेल पाहिलंय का ?

येत्या तीन नोव्हेंबरला अॅपल आपला आयफोन एक्स हा नवीन मोबाईल बाजार उतरवणार आहे. अनेक नवनवीन फीचर्स या मोबाईलमध्ये भरणा केलामुळे पाहताच क्षणी ग्राहकांमध्ये या मोबाईल विषयी कुतूहल निर्माण होऊ लागले आहे. ..

पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक

जन-गण-मन हे भारतीय राष्ट्रगीत यावर बराच वेळ झळकत होते...

चीन रोबोट निर्मितीसाठी देणार ६०० मिलियन युआन

चीनच्या 'मेड इन चायना २०२५' च्या धोरणाअंतर्गत २०२० पर्यंत चीनने १५ लाख स्वदेशी बनावटीच्या रोबोटची निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच बरोबर देशातील माहिती तंत्रज्ञान, अवकाश विज्ञान, स्वयंचलित यंत्रणा या क्षेत्रात अधिक संशोधन आणि निर्मितीला चालना देणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश असणार आहे...

कम्युनिस्ट रशियात इंटरनेटवर बंदी

दरम्यान या विधेयकाला रशियामधून तीव्र विरोध करण्यात येत आहे. ..

गूगलचे प्रमुख सुंदर पिचाई आता 'अल्फाबेट'च्या संचालक मंडळात

सुंदर पिचाई यांनी गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे, म्हणूनच त्यांची अल्फाबेटच्या संचालक मंडळात वर्णी लागत आहे, अशी प्रतिक्रिया अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी पेज यांनी दिली आहे...

जगातील सगळ्यात जाड महिलेने केले ३०० किलो वजन कमी

आपल्या वजनामुळे प्रसिद्ध झालेल्या जगातील सगळ्यात जाड महिलेने म्हणडेच ईमान अहमदने उपचारांनंतर आता ३०० किलो वजन कमी केले आहे. सध्या त्या अबूधाबी येथील बुर्जिल रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आता ईमानचे वजम सुमारे १८५ किलो राहिले आहे, त्याला १००च्या खाली आणण्याचा प्रयत्न सुरु आहे...

दोन्ही हातांचे प्रत्यारोपण होऊनसुद्धा चिमुकला खेळतोय बेसबॉल 

जगातली पहिली दुहेरी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरलेल्या अनेक केसेस आपण ऐकत असतो. मात्र अवघ्या नऊ वर्षे वयात दोन्ही हात एका आजारामुळे गमवावे लागलेला अमेरिकन झिऑन हार्वे या मुलावर वयाच्या आठाव्या वर्षी म्हणजे दोन वर्षांआधी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले आहे...

चीनने विकसित केली नवीन बुलेट ट्रेन

या ट्रेनचे चायनीज भाषेत 'फुझिंग' असे नामकरण करण्यात आले असून चीनमधील आतापर्यंतची ही सर्वात वेगवान बुलेट ट्रेन असणार आहे...

इस्रो करणार सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण

जीएसएलव्ही-मार्क III हे आतापर्यंतचे इस्रोचे सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र असणार आहे...

नासा राबवणार जगातील पहिली सौर मोहीम

ही मोहीम जगासाठी उत्सुकतेची ठरणार असून, बऱ्याच अंशी यात अनेक बाबतीत अनिश्चितता देखील आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले असून, मानव जातीला यातून खूप काही मिळणार आहे. ..

नासा आणि इस्रो बनवणार जगातील सर्वात मोठा उपग्रह

या प्रकल्पाचे पूर्ण नाव नासा-इस्रो सिंथेटिक अपरचर रडार सॅटेलाइट असे असून याच्या निर्मितीसाठी १ खर्व रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ..

प्रसिद्ध वेबसाईट 'झोमॅटो'मधील १७ दशलक्ष युझर्सची माहिती हॅक

झोमॅटो वेबसाईटची १७ दशलक्ष युझर्सची माहिती हॅक करण्यात आली आहे. याबद्दल स्वत: झोमॅटोने ब्लॉग लिहून ग्राहकांना कळविले आहे...

आपल्याला डिजिटल इंडियाबद्दल हे माहित आहे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली...

आयआयटीतील ब्रेनड्रेन कमी करण्याच्या प्रयत्नात सरकार

विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्यासाठी प्रतिमाह ७५ हजार रुपयांची तरतूद व्हावी यासाठी शिफारस करण्यात आली आहे...

नासाचे 'कसिनी' उपग्रह शनीच्या कड्यांमधून पार

कसिनीने गेल्या २४ तारखेला शनीच्या कड्यांमध्ये प्रवेश केला होता. यादरम्यान कसिनीचा पृथ्वीबरोबर असलेला संबंध तुटला होता. ..