मुंबई : (US Iran Naval Clash) अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना अमेरिकेच्या अमेरिकन नौदलाच्या विनाशिका या तीन युद्धनौकांवर हल्ला झाला. मात्र या युद्धनौकांना कोणतीही हानी पोहोचली नाही. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात इराणी हल्लेखोरांचे मोठे नुकसान झाले आणि अमेरिकेचा इराणवर प्रतिहल्ला यशस्वी ठरला.(US Iran Naval Clash)
ट्रम्पचा सोशल मीडिया दावा
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर लिहिले की, तीन अत्याधुनिक अमेरिकन विनाशिका होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित पार झाल्या. पण त्यांच्यावर इराणकडून हल्ला करण्यात आला. ते म्हणाले की, जहाजांना इजा झाली नाही; मात्र प्रत्युत्तरात इराणी सैन्याचे मोठे नुकसान झाले.(US Iran Naval Clash)
President Trump on IRAN CeaseFire: I'll let you know when there's no ceasefire.
You won't have to know. If there's no ceasefire, you're not going to have to know. You're just going to have to look at one big glow coming out of Iran. pic.twitter.com/3850zoTOCA
— Donald J Trump Posts TruthSocial (@TruthTrumpPost) May 8, 2026
इराणचा इशारा - तणाव आणखी वाढणार का?
इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे की, जर आक्रमक कारवाई सुरूच राहिली तर भविष्यात आणखी अनेक मोठ्या कारवायांना सामोरे जावे लागेल. ट्रम्प यांनी इराणला सांगितले की, करारावर स्वाक्षरी न केल्यास अमेरिका अधिक हिंसक लष्करी प्रतिसाद देईल. अमेरिकेच्या लष्कराने पुष्टी केली की, इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात त्यांच्या लष्करी तळांवर कारवाई करण्यात आली.(US Iran Naval Clash)
८ एप्रिलपासून लागू झालेल्या युद्धविरामाने परिस्थिती काही दिवस शांत होती. पण आता पुन्हा तणाव वाढला आहे. इराणने आरोप केला आहे की, अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत प्रवेश करणार्याा दोन जहाजांना लक्ष्य केले आणि इराणी भूभागावर हल्ले केले. हे युद्धविरामाचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे इराणचे म्हणणे आहे.(US Iran Naval Clash)
President Trump posts on TruthSocial: Three World Class American Destroyers just transited, very successfully, out of the Strait of Hormuz, under fire. There was no damage done to the three Destroyers, but great damage done to the Iranian attackers.
— Donald J Trump Posts TruthSocial (@TruthTrumpPost) May 7, 2026
नागरी वस्त्यांवर हल्ल्यांचे आरोप
इराणचा आरोप आहे की अमेरिकेने केशम बेट, बंदर खमीर आणि सिरीक किनारपट्टीचे प्रदेश येथे नागरी वस्त्यांवर हवाई हल्ले केले. प्रत्युत्तरादाखल इराणने होर्मुझच्या पूर्व भागात आणि चाबहार बंदराजवळ अमेरिकन लष्करी जहाजांना लक्ष्य केल्याचे सांगितले.(US Iran Naval Clash)
अणुकार्यक्रमावरून वाद कायम
वॉशिंग्टनकडून एका शांतता प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादाची वाट पाहण्यात येत आहे. मात्र इराणचा अणुकार्यक्रम, लष्करी हालचाली आणि अमेरिका-इराण भू-राजकीय संघर्ष अजूनही ताणाव निर्माण करत आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की परिस्थिती सुधारली नाही तर पश्चिम आशियात मोठे संकट उद्भवू शकते.(US Iran Naval Clash)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.