मुंबई : (Thalapathy Vijay CM News) तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत असून, दाक्षिणात्य सुपरस्टार विजय यांच्या तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) पक्षाने मोठी झेप घेतली आहे. या निवडणुकीत टीव्हीके तब्बल १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.(Thalapathy Vijay CM News)
बहुमतासाठी केवळ १० जागांची गरज असताना, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाने टीव्हीकेला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे.(Thalapathy Vijay CM News)
एआयएडीएमकेचा ‘किंगमेकर’ रोल
एआयएडीएमकेकडे असलेल्या ४७ आमदारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे विजय यांच्या पक्षाचे सरकार स्थापन करण्याचे समीकरण आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट निर्माण झाला आहे.(Thalapathy Vijay CM News)
अंतर्गत बंडखोरीनंतर निर्णय
हा निर्णय सहज घेतलेला नसून, एआयएडीएमकेमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत राजकीय नाट्य घडले. पक्षाचे वरिष्ठ नेते सी. व्ही. षण्मुगम आणि एस. पी. वेलुमणी यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. सूत्रांच्या माहितीनुसार, ३० हून अधिक आमदारांनी एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्यावर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव आणला होता. जर निर्णय झाला नाही, तर पक्ष सोडून थेट विजय यांना पाठिंबा देण्याचा इशाराही देण्यात आला होता.(Thalapathy Vijay CM News)
या पाठिंब्यामुळे विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. चित्रपटसृष्टीत सुपरस्टार असलेले विजय आता राजकारणातही मोठे स्थान निर्माण करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यांच्या विकासाभिमुख अजेंड्याला आणि नव्या राजकीय पर्यायाला विशेषतः तरुण मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.(Thalapathy Vijay CM News)
आता पुढे काय?
आता सर्वांचे लक्ष अधिकृत घोषणेकडे लागले असून, पुढील काही दिवसांत सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. विजय यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.(Thalapathy Vijay CM News)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.