पुणे-पिंपरी हादरले! विषारी हातभट्टी दारूमुळे मृत्यूंचा हाहाकार; आरोपी ताब्यात, अनेकांची प्रकृती गंभीर...

Total Views |
Pimpri Chinchwad Illicit Liquor
 
मुंबई : (Pimpri Chinchwad Illicit Liquor) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कथित विषारी दारूमुळे सुरू झालेल्या मृत्यूंच्या मालिकेने संपूर्ण राज्य हादरले आहे. फुगेवाडी, दापोडी, आनंदवन, काटेवस्ती, आझाद चौक, जय महाराष्ट्र चौक तसेच हडपसरमधील पांढरे मळा आणि काळेपडळ परिसरात एकामागून एक मृत्यू झाल्याने भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये १२ तर पुणे शहरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण गंभीर अवस्थेत विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Pimpri Chinchwad Illicit Liquor)
 
मृत्यूंची सुरुवात कशी झाली?
 
फुगेवाडी परिसरात एका दिवसात सलग पाच जणांचे मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीरता समोर आली. गावातील शोकफलकांवर मृतांची नावे झळकू लागल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला काही मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मृत व्यक्तींमध्ये चक्कर येणे, तोंडाला फेस येणे, उलट्या होणे, अचानक बेशुद्ध पडणे अशी समान लक्षणे आढळल्यानंतर संशय अधिक गडद झाला.
 
स्थानिक नागरिकांनी या सर्व मृत्यूमागे अवैध हातभट्टीची विषारी दारू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. परिसरात अनेक दिवसांपासून बेकायदेशीर गावठी दारू विक्री सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.(Pimpri Chinchwad Illicit Liquor)
 
मिथेनॉलमुळेच मृत्यू? तपासात धक्कादायक माहिती...
 
प्राथमिक तपासात दारूमध्ये मिथेनॉल किंवा विषारी स्पिरिट मिसळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मिथेनॉल हे अत्यंत धोकादायक रसायन असून त्याचे सेवन झाल्यास अंधत्व, अवयव निकामी होणे आणि मृत्यू होऊ शकतो. आरोपी योगेश वानखेडे हा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात हातभट्टीची दारू पुरवत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
 
योगेश वानखेडेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात आहे. फुगेवाडी परिसरातील कर्नलसिंह विरखा नावाच्या व्यक्तीकडून ही दारू विकली जात असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात विविध ठिकाणी छापे टाकून आठ जणांना अटक केली आहे.(Pimpri Chinchwad Illicit Liquor)
 
पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचा संताप
 
या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक महिलांनी वारंवार तक्रारी करूनही परिसरातील बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर कायमस्वरूपी कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे. “पोलीस येतात, थोडी कारवाई करतात आणि काही दिवसांनी पुन्हा दारू विक्री सुरू होते,” असा आरोप नागरिकांनी केला. काही नागरिकांनी तर पोलिसांवर हप्ते घेत असल्याचे गंभीर आरोपही केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.(Pimpri Chinchwad Illicit Liquor)
 
हडपसरमध्येही पाच जणांचा मृत्यू
 
दुसरीकडे, हडपसरमधील पांढरे मळा वस्तीतही कथित विषारी दारूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींनी स्थानिक बेकायदेशीर दारू अड्ड्यावर दारू सेवन केल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे समोर आले आहे. पोटदुखी, मळमळ आणि चक्कर येत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून अनेक कुटुंबांचे कर्ते पुरुष गमावल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत.(Pimpri Chinchwad Illicit Liquor)
 
मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; “ही एक प्रकारची हत्या”
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला अत्यंत गंभीर संबोधत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. “ही केवळ दुर्घटना नसून एक प्रकारची हत्या आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. दोषींना अटक करण्यात आली असून संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन तपासाचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.(Pimpri Chinchwad Illicit Liquor)
 
मृत्यूशी झुंज देणारे रुग्ण
 
सध्या सुभाष डिगीकर आणि अक्षय अवसरमल यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. परिसरात अजूनही भीतीचे वातावरण असून नागरिकांनी राज्य सरकारकडे बेकायदेशीर हातभट्टी व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.(Pimpri Chinchwad Illicit Liquor)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com