मुंबई: (Monsoon 2026) यंदा मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये १६ मे रोजी म्हणजे साधारण सहा दिवस आधी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झालं होतं. एरव्ही २२ मे रोजी अंदमानात दाखल झाल्यावर पुढच्या आठ एक दिवसांत म्हणजे १ जून पर्यंत मान्सून केरळला पोहोचतो. पण यावेळी दहा दिवस उलटून गेले तरी मान्सून केरळला पोहोचलेला नाही. २६ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज गेल्या आठवड्यात हवामान विभागानं वर्तवला होता, पण नंतर तो मागे घेतला. (Monsoon 2026)
२७ मे रोजी मान्सूननं बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात आगेकूच करत आणखी काही भाग व्यापला आहे. केवळ वाऱ्यांनी दिशा बदलली म्हणजे मान्सून आल्याचं जाहीर करा, असं नसतं. तर त्यासाठी काही निकष पूर्ण व्हावे लागतात. त्या ठिकाणचं पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग, ढगांचं प्रमाण आणि तापमानाची स्थिती अशा गोष्टी त्यासाठी लक्षात घेतल्या जातात. केरळ आणि लक्षद्वीपमधल्या १४ ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान ६० टक्के म्हणजे ९ ठिकाणी १० मे नंतर कधीही सलग २ दिवस २.५ मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आणि वाऱ्याचा वेग आणि तापमानाचे निकष पूर्ण झाले, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो. मात्र, सध्या केरळच्या आसपास वाहणारे वारे तुलनेनं क्षीण आहेत. (Monsoon 2026)
सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अपर एयर सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजे हवेच्या वरच्या स्तरात चक्राकार फिरणाऱ्या वाऱ्यांची सिस्टिम कार्यरत आहे. पण त्यातून कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन तयार होण्याची शक्यता सध्यातरी नाही. एरवी या काळात चक्रीवादळं तयार झाली, तर त्यातून मान्सूनला गती मिळण्याची शक्यता असते. (Monsoon 2026)
महाराष्ट्रातील सध्याचे हवामान...
उपग्रहानं पाठवलेलं चित्र पाहता, महाराष्ट्रासह दक्षिण भारतातल्या काही भागांत ढगाळ हवामान आहे. विशेषतः राज्याच्या दक्षिणेकडील भागांत तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पावसानंही हजेरी लावली आहे. पण विदर्भात उष्णतेपासून इतक्यात म्हणजे पुढच्या किमान दोन तीन दिवसांत तरी सुटका होणार नाही, असंच चित्र आहे. २७ मे रोजी विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. इथे रात्रीचं किमान तापमानही २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहील. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली परिसरात रात्रीही पारा ३० ते ३२ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. कोकणातही रात्रीच्या उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. (Monsoon 2026)
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेले इशारे पाहिले, तर २७ मे रोजी उष्ण रात्रीसाठी वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथे रेड अलर्ट आहे, तर अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. २८ मे रोजीही इथे हीच स्थिती कायम राहील. तर २८ मे रोजी पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई परिसरात उष्णतेसाठी यलो अलर्ट आहे. अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड, कोल्हापूर तसंच पुणे आणि साताऱ्याचा पठारी भाग इथे मान्सूनपूर्व वादळी पावसासाठी यलो अलर्ट आहे. (Monsoon 2026)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.