Meenakshi Seshadri: ज्येष्ठ अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीची सध्याच्या सेलिब्रिटी संस्कृतीवर जोरदार टीका, नेमकं काय म्हणाली?

Total Views |
 
Meenakshi Seshadri
 
मुंबई: (Meenakshi Seshadri) बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिने सध्याच्या सेलिब्रिटी संस्कृती आणि सोशल मिडिया केंद्रित ग्लॅमर जगतावर परखड टीका केली आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितले की, आजच्या काळात काम आणि अभिनयपेक्षा चर्चेत राहणे आणि प्रसिद्धी मिळवणे हे खरे स्टारडमचे मोजमाप बनले आहे. काही कलाकार प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी स्वीकारत असल्याचेही तिने सांगितले. (Meenakshi Seshadri)
 
मीनाक्षी शेषाद्री नेमकं काय म्हणाली?
 
आज अनेक कलाकार कामामुळे नव्हे, तर फक्त पब्लिसिटीमुळे ओळखले जातात. काही जण तर केवळ 'कपडे घालून किंवा कपडे न घालून'ही बातम्यांमध्ये राहतात. सतत लोकांच्या नजरेसमोर राहणं, सोशल मीडियावर चर्चेत असणं, हेच आज स्टारडमचं नवं मोजमाप बनलं आहे. (Meenakshi Seshadri)
 
आमच्या काळात चित्रपट हिट झाला, भूमिका प्रभावी ठरली किंवा गाणं लोकप्रिय झालं, तर कलाकार चर्चेत यायचा. आता मात्र सोशल मीडिया पोस्ट, विमानतळावरील फोटो किंवा फॅशन स्टेटमेंटवरूनही प्रसिद्धी मिळते. आज मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्याची स्पर्धा इतकी वाढली आहे की कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यापासून कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट ‘कंटेंट’ बनली आहे. (Meenakshi Seshadri)
 
माझं कामच माझ्यासाठी बोललं पाहिजे, अशी माझी भूमिका होती. कलाकार म्हणून प्रेक्षकांनी तुमच्या अभिनयासाठी लक्षात ठेवलं पाहिजे, हीच खरी कमाई असते. (Meenakshi Seshadri)
 
८०-९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक....
 
मीनाक्षी शेषाद्री ही १९८० आणि १९९० च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. हिरो (१९८३) या चित्रपटातून तिने देशव्यापी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर दामिनी, घटक, शहेनशाह, मेरी जंग यांसारख्या चित्रपटातील तिची भूमिका आणि गाणी विशेष गाजल्या. अभिनयाबरोबरच तिचे नृत्यकौशल्य आणि स्क्रीन‑प्रेजन्समुळे तिच्या भक्त‑मंडळीची वाढती लोकप्रियता राहिली. (Meenakshi Seshadri)
 
१९९५ मध्ये गुंतवणूक बँकर हरिश मैसूर यांच्याशी विवाहानंतर तिने चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि अमेरिकेत स्थायिक झाली. मात्र, आजही ती विविध मुलाखती आणि सार्वजनिक कार्यक्रमांतून बॉलिवूडमधील बदलांवर स्पष्ट मत मांडताना दिसते. तिच्या या ताज्या वक्तव्यामुळे सध्याच्या सेलिब्रिटी संस्कृती, सोशल मीडिया प्रसिद्धी आणि ग्लॅमर उद्योगातील बदलांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. (Meenakshi Seshadri)
 
सध्या ती अमेरिकेतील Texas राज्यात राहते आणि तिथे प्रामुख्याने भारतीय शास्त्रीय नृत्य शिकवण्याचं काम करते. तिने स्वतःची डान्स स्कूल सुरू केली असून भरतनाट्यम, कथक आणि ओडिसी यांसारख्या नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. भारतीय संस्कृती आणि शास्त्रीय कलेचा प्रसार करण्यासाठी ती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सहभागी देखील होते. (Meenakshi Seshadri)
 
मीनाक्षी शेषाद्री सोशल मीडियावरही सक्रिय असून, अनेकदा नृत्याचे व्हिडिओ, जुने चित्रपटस्मरण आणि वैयक्तिक आयुष्यातील क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. अधूनमधून भारतातही येते आणि चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा मुलाखतींमध्ये सहभागी होते. (Meenakshi Seshadri)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com