मुंबई : (Trump Iran Israel Tension) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावरून परतल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बीजिंगहून परतताच ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. या चर्चेत इराणचा अणुकार्यक्रम, संभाव्य लष्करी कारवाई आणि चीन दौऱ्यातील घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.(Trump Iran Israel Tension)
इराणला ट्रम्प यांचा थेट इशारा
पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इराणला कठोर शब्दांत इशारा दिला. “वेळ झपाट्याने निघून चालली आहे. इराणने तातडीने निर्णय घेतला नाही, तर नंतर काहीच उरणार नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले. या विधानामुळे अमेरिका पुन्हा इराणविरोधात कठोर पावले उचलणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.(Trump Iran Israel Tension)
नेतन्याहू-ट्रम्प चर्चा; युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता
इस्रायली माध्यमांच्या माहितीनुसार, नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यातील चर्चा इस्रायलच्या सुरक्षा कॅबिनेट बैठकीपूर्वी झाली. या चर्चेनंतर इराणसोबतचा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, इराणवर लष्करी कारवाईचा मुद्दा अद्याप खुला आहे आणि अंतिम निर्णय ट्रम्प यांनाच घ्यायचा आहे. जर अमेरिका युद्धाचा मार्ग स्वीकारला, तर इस्रायललाही त्यात सहभागी होण्याची विनंती केली जाऊ शकते.(Trump Iran Israel Tension)
काही अहवालांनुसार, इराणच्या धोरणांमुळे ट्रम्प प्रशासन नाराज आहे. विशेषतः अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्यास इराण तयार नसल्याने अमेरिका अधिक आक्रमक होत असल्याचे सांगितले जात आहे. गुप्तचर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इराण सध्या “वेळकाढूपणा आणि दिशाभूल” करण्याची रणनीती वापरत आहे, जेणेकरून संभाव्य अमेरिकन कारवाई गुंतागुंतीची बनवता येईल.(Trump Iran Israel Tension)
इराणसमोर अमेरिकेच्या पाच मोठ्या अटी
इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेने इराणसमोर काही कठोर अटी ठेवल्या आहेत. यामध्ये नुकसानभरपाई न देणे, समृद्ध यूरेनियम अमेरिकेकडे सुपूर्द करणे आणि अणुस्थळांवर मर्यादा घालणे यांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या प्रमुख अटी:
इराणला कोणतीही आर्थिक नुकसानभरपाई दिली जाणार नाही
४०० किलो समृद्ध यूरेनियम अमेरिकेकडे द्यावे लागेल
इराणला फक्त एकच अणु सुविधा सुरू ठेवण्याची परवानगी असेल
परदेशात गोठवलेल्या मालमत्तेतील २५% हिस्सा परत देण्यास नकार
विविध संघर्ष संपवण्यासाठी तातडीने प्रगती आणि कराराची मागणी
मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची भीती
अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. जागतिक तेलबाजार, ऊर्जा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. आता ट्रम्प प्रशासन पुढे कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.(Trump Iran Israel Tension)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.