पुणे: (NEET paper leak 2026) नीट पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. केंद्र सरकारनं या प्रकरणाची तातडीची दखल घेत आधीची परीक्षा रद्द करत नव्यानं परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, इतकंच नाही तर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. सीबीआयच्या तापासात पेपरफुटी प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय. यात पहिल्यांदा नाशिकमधून शुभम खैरनारला अटक करण्यात आली, त्यानंतर या प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर आलं. पुण्यातील ब्युटी पार्लर व्यावसायिक मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आल्यानंतर, पुण्यातूनच दोन प्राध्यापकांना अटक करण्यात आलीय. यात एनटीएच्या तज्ज्ञ आणि जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि निवृत्त प्राध्यापक आणि एनटीए पॅनेलशी संबंध असलेल्या पीव्ही कुलकर्णी यांचा समावेश आहे. यासोबतच एका आयुर्वेद डॉक्टरलाही पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती आहे. ही सगळी पेपरफुटी पुण्यातूनच सुरु झाल्याचं आता तपासात समोर येतंय. (NEET paper leak 2026)
पुणे हेच पेपरफुटीचं मुख्य केंद्र?
पुण्यातील ब्युटिशियन आणि शैक्षणिक सल्लागार म्हणवून घेणाऱ्या मनीषा वाघमारे हिची भूमिका या प्रकरणात महत्त्वाची मानण्यात येते आहे. शिक्षण क्षेत्रात असलेल्या संपर्काच्या आधारावर मनीषा वाघमारेनं श्रीमंत असलेल्या नीटच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केलं. प्राध्यापिका मनीषा मांढरे या नीट प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असल्याची माहिती मिळाल्यानंतर मनीषा वाघमारे हिनं मांढरे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या संपर्कातून पेपरफुटी घडवून आणली. प्रश्नपत्रिका आधी देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून सुमारे १० लाख रुपये घेण्यात आले. हे पैसे आरोपींमध्य़े वाटून घेण्यात येणार होते. (NEET paper leak 2026)
जीवशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका मनीषा मांढरे यांच्या माध्यमातून मिळवण्यात आली. वनस्पतीशास्त्र आणि जीवशास्त्रासाठी मांढरे या तज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. परीक्षेपूर्वी अंतिम प्रश्नपत्रिकेपर्यंत त्यांनाच प्रवेश होता. (NEET paper leak 2026)
या कटात मांढरे यांनी निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांनाही सहभागी करुन घेतले. नाशिकच्या शुभम खैरनार याने कोचिंग आणि कौन्सिलिंगच्या माध्यमातून फोडलेल्या प्रश्नपत्रिका देशभरात नेण्याचं काम केलं. (NEET paper leak 2026)
फोडण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअप, मेसेजमधून तसंच पीडीएफ फाईल्सच्या माध्यमातून विविध राज्यातील कोचिंग क्लासेसपर्यंत पोहचले. (NEET paper leak 2026)
लीक झालेली पीडीएफ गुरुग्राममधील आरोपी यश यादवपर्यंत पोहोचली, त्यानंतर ती जयपूरपर्यंत पोहचली. राजस्थानमधील काही शिक्षकांना हा गेस पेपर आणि प्रत्यक्ष नीटपरीक्षेतील प्रश्न तंतोतंत जुळत असल्याचं लक्षात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. (NEET paper leak 2026)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.