NEET Paper Leak 2026: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर स्थित आरसीसी कोचिंगचे संस्थापक अटक; कोण आहेत शिवराज मोटेगावकर?

Total Views |
 
NEET Paper Leak 2026
 
मुंबई: (NEET paper leak 2026) वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. राजस्थानपासून सुरू झालेल्या या घोटाळ्याचे धागेदोरे आता महाराष्ट्रात पोहोचले असून, पुणे, लातूर आणि नांदेड येथे CBI च्या छाप्यांनंतर अनेकांना ताब्यात घेण्यात आले. यातील सर्वात मोठा ट्विस्ट लातूरच्या आरसीसी कोचिंगचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्यामुळे निर्माण झाला आहे. (NEET paper leak 2026)
 
शिवराज मोटेगावकर यांनी महाविद्यालयीन जीवनातच होम ट्युशन सुरू करत खासगी कोचिंगसाठी सुरुवात केली होती. नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवून देणारं कोचिंग क्लास असा आरसीसीबाबत दावा केला जात असे. (NEET paper leak 2026)
 
लातूर हे पूर्ण देशात NEET तयारीसाठी विशेष ओळखले जाणारे शहर असून, तेथूनच पेपरफुटीचा धोका वाढत असल्याची शंका व्यक्त झाली. त्यानुसार, CBI ने २८ अधिकाऱ्यांचे मोठे पथक लातूरला पाठवले. या पथकाने मोटेगावकर यांची जवळपास ८ ते १० तास चौकशी केली. चौकशीत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आणि काही संशयास्पद बाबी आढळल्याने त्यांना अखेर ताब्यात घेण्यात आले. (NEET paper leak 2026)
 
 हेही वाचा: NEET paper leak 2026: देशव्यापी नीट पेपरफुटीचं केंद्र पुणे, १० पैकी ३ सूत्रधार आरोपींचं पुणे कनेक्शन समोर
 
मोटेगावकर यांची शैक्षणिक व्यावसायिक पार्श्वभूमी...
 
शिवराज मोटेगावकर यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका गरिबीतून आलेल्या शेतकरी कुटुंबात झाला. शिक्षणाची फारशी योग्य परिस्थिती नसताना त्यांनी उच्चशिक्षणासाठी लातूरला राहायला येऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून एम.एस्सी. रसायनशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन अभ्यासातच घराला हातभार लावण्यासाठी होम ट्युशनची सुरुवात केली, जिथून त्यांचे कोचिंग करिअर सुरू झाले. (NEET paper leak 2026)
 
प्राध्यापक म्हणून उमरगा (धाराशिव) आणि लातूरमधील महाविद्यालयांमध्ये केमिस्ट्री विषयाचे तास घेण्याबरोबरच त्यांनी “रेणुकाई/ आरसीसी कोचिंग क्लासेस”ची स्थापना केली. सुरुवातीला फक्त केमिस्ट्री, पुढे “सर्व विषय एकाच छताखाली” या संकल्पनेवर RCC ची मुख्य ओळख घडवली. गेल्या २३ वर्षांपेक्षा जास्त काळापासून केमिस्ट्री शिकवणाऱ्या मोटेगावकरांनी NEET चे विशिष्ट पॅटर्न तयार केले. दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या पॅटर्नमधून यश मिळत असल्याचा दावा आणि NEET पेपरमध्ये त्यांच्या गेस पेपरमधील प्रश्न जुळत असल्याचे ते नेहमीच जाहीरपणे म्हणत आले. (NEET paper leak 2026)
 
कोरोना काळात पूर्ण ऑफलाइन शिक्षण बंद झाल्यावर मोटेगावकरांनी स्वतःची तांत्रिक बळकटी वापरून ऑनलाईन क्लासेस सुरू केले. आक्रमक मार्केटिंग आणि डिजिटल वाढ ही मेट्रिक आरसीसी सारख्या इंस्टिट्यूशनचे नाव लातूर–मराठवाड्यापुरते न राहता देशभरात पसरले. आता CBI च्या तपासात हे जाळे कसे NEET पेपरफुटी प्रकरणाशी निगडित आहे, हे बघणे आवश्यक आहे. (NEET paper leak 2026)
 
या घटनेमुळे लातूर पॅटर्न आणि प्रायव्हेट कोचिंग संस्थणांवर अधिक दबाव आणि निरीक्षण येणार असून, NEET प्रवेश प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षता यावर पुन्हा एकदा भर पडणार आहे. (NEET paper leak 2026)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com