चीन दौऱ्यापूर्वी अधिकाऱ्यांचा तीन महिने आधीच तळ, कसून तपासणी, हॉटेल सुरक्षा कडक, दोन बोईंग विमानांचा बडदास्त! कसा आहे ट्रम्प यांच्या दौऱ्यातील फौजफाटा?
मुंबई (Donald Trump visit China) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या तीन दिवसीय चीन दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षा यंत्रणेची विशेष चर्चा होत आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी जवळपास तीन महिन्यांपूर्वीच चीनमध्ये दाखल झाले असून, राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
सुरक्षा यंत्रणेकडून कोण-कोणती काळजी घेतली जाते?
अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यापूर्वी एक सर्वेक्षण गटाची नेमणूक केली जाते. या गटामध्ये प्रामुख्याने यूएस सीक्रेट सर्व्हिस, व्हाइट हाऊस स्टाफ, प्रेसिडेन्शियल अॅडव्हान्स एजंट आणि मिलिटरी असिस्टंट (High-level security) अधिकारी यांचा समावेश असतो. हा गट राष्ट्राध्यक्षांच्या हवाई मार्गातील सर्व संभाव्य अडचणींचा आढावा घेतो. तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोल केंद्रांना भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांसोबत सुरक्षेविषयी चर्चा करतो. (Donald Trump visit China) याशिवाय हा गट स्थानिक सुरक्षा पथकांसोबत प्रत्येक सुरक्षाविषयक बाबीची बारकाईने तपासणी करतो. कार्यक्रमस्थळाच्या आसपासच्या मानसिक रुग्णालयांनाही भेट देऊन तेथील सुटलेल्या रुग्णांची माहिती घेतली जाते.
दरम्यान, राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यासोबत अनेक हेलिकॉप्टर आणि वाहनेही नेली जातात. राष्ट्राध्यक्षांचा दौरा सुरू होण्यापूर्वी अमेरिकन हवाई दलाने जॉइंट बेस अँड्र्यूज येथील धावपट्टी आणि एअर फोर्स वन विमानांची कसून तपासणी केली. ‘एअर फोर्स वन’ म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रवास करत असलेले कोणतेही विमान होय. सध्या राष्ट्राध्यक्ष वापरत असलेली दोन विमाने बोईंग ७४७-२००बी प्रकारातील असून, ती राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा आणि विशेष गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत.
एअर फोर्स वनमधून उतरल्यावर राष्ट्राध्यक्ष सहसा ‘कॅडिलॅक वन’ या निळ्या रंगाच्या गाडीतून प्रवास करतात. ही गाडी जगभरात ‘द बीस्ट’(The Beast) या नावाने ओळखली जाते. ५.५ मीटर लांबीच्या या चिलखती वाहनाचे वजन सुमारे ९ टन आहे. या गाडीच्या खिडक्या बुलेटप्रूफ असून त्यामध्ये एकावेळी सात लोक बसू शकतात. गाडीमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी गाडीतील रेफ्रिजरेटरमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या रक्तगटाशी जुळणारे रक्तही ठेवले जाते. तसेच एजंट हे सुनिश्चित करतात की राष्ट्राध्यक्ष ट्रॉमा हॉस्पिटलपासून १० मिनिटांपेक्षा अधिक अंतरावर कधीही नसतील. सर्वात जवळच्या रुग्णालयात एक सीक्रेट सर्व्हिस एजंट कायम तैनात असतो.(Donald Trump visit China)
WATCH: 🇺🇸🇨🇳 President Trump’s motorcade arrives at Beijing’s Great Hall, where he is formally welcomed by Chinese President Xi Jinping. pic.twitter.com/z4Aw4f9sfk
— Donald J Trump Posts TruthSocial (@TruthTrumpPost) May 14, 2026
राष्ट्राध्यक्ष ज्या हॉटेलमध्ये राहतात, त्या हॉटेलजवळ इतर वाहने उभी करण्यास मनाई असते. हॉटेलपासून गाडीपर्यंत मंडपासारखा सुरक्षित मार्ग तयार केला जातो,(High-level security) जेणेकरून राष्ट्राध्यक्ष थेट जनतेच्या नजरेस पडणार नाहीत. राष्ट्राध्यक्ष राहत असलेल्या हॉटेलचे तीन मजले सीक्रेट सर्व्हिस एजंट ताब्यात घेतात. राष्ट्राध्यक्ष राहत असलेल्या मजल्याच्या वर किंवा खाली कोणत्याही बाहेरील व्यक्तीला राहण्याची परवानगी नसते.
राष्ट्राध्यक्षांच्या आगमनापूर्वी सीक्रेट सर्व्हिस एजंट हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी करतात. अगदी किरकोळ गुन्हे किंवा भांडणांमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही प्रवेश नाकारला जातो. एजंट राष्ट्राध्यक्षांच्या खोलीतील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बदलून स्वतःची सुरक्षित उपकरणे बसवतात. ते टेलिव्हिजन, फोन आणि इतर साधने हटवून स्वतःची उपकरणे वापरतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ३१ मार्च ते २ एप्रिलदरम्यान चीन दौऱ्यावर जाणार होते, मात्र इराण युद्धामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला. आता ट्रम्प १३ ते १५ मेदरम्यान (The Summit)चीनचा दौरा करत आहेत. १३ मे रोजी ट्रम्प बीजिंगमध्ये पोहोचतील. त्यांच्यासोबत अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प तसेच इलॉन मस्क, टिम कुक, डायना पॉवेल आणि केली ऑर्टबर्ग यांसारखे उद्योगपती असतील.(Donald Trump visit China)
President Trump: 🇺🇸🇨🇳 You're a great leader. I say it to everybody. You're a great leader.
I really look very much forward to our discussions, a big discussion. There are those that say this is maybe the biggest summit ever.
— Donald J Trump Posts TruthSocial (@TruthTrumpPost) May 14, 2026
१४ मे रोजी ट्रम्प चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील. ट्रम्प यांच्यासोबत आलेले उद्योगपती आणि इतर अमेरिकी अधिकारीदेखील विविध बैठका घेणार आहेत. त्यानंतर शी जिनपिंग आणि ट्रम्प ‘टेम्पल ऑफ हेवन’ला भेट देतील. संध्याकाळी ट्रम्प यांच्या सन्मानार्थ शासकीय मेजवानीचे आयोजन करण्यात येणार आहे.
१५ मे रोजी सकाळच्या चहापाण्यावेळी आणि दुपारच्या जेवणावेळी आणखी काही बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर ट्रम्प त्याच दिवशी अमेरिकेला रवाना होतील. सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प यांचा दौरा केवळ बीजिंगपुरताच मर्यादित ठेवण्यात आला असून ते चीनमधील इतर कोणत्याही शहराला भेट देणार नाहीत.(Donald Trump visit China)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.