मुंबई : (PM Modi Fuel Saving Drive) जागतिक इंधन संकट, वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि परकीय चलनावरील दबावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा आणि प्रतीकात्मक निर्णय घेतला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि सरकारी खर्चात कपात करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील (Cavalcade) गाड्यांची संख्या तब्बल ५० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. (PM Modi Fuel Saving Drive)
या निर्णयानंतर आता पंतप्रधानांच्या ताफ्यात पूर्वीपेक्षा निम्म्याच गाड्या दिसणार आहेत. विशेष म्हणजे, सुरक्षेचे सर्व नियम पाळत गाड्यांची संख्या कमी करण्याचे आदेश देण्यात आले असून, इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्राधान्य देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.(PM Modi Fuel Saving Drive)
PM मोदींच्या ताफ्यात मोठी कपात
पंतप्रधान मोदींनी सुरक्षा संस्था SPG ला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तेवढ्याच गाड्या ताफ्यात ठेवण्यात याव्यात. यामागील मुख्य उद्देश म्हणजे सरकारी खर्चात बचत करणे, इंधनाचा वापर कमी करणे आणि देशासमोर आदर्श निर्माण करणे. विशेष बाब म्हणजे या बदलासाठी कोणतीही नवीन गाडी खरेदी केली जाणार नाही. उपलब्ध वाहनांचाच पुनर्वापर करून नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी केली जाणार आहे.(PM Modi Fuel Saving Drive)
इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य
पंतप्रधानांनी ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक प्रशासनाचा संदेश देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सरकारी यंत्रणांमध्ये EV चा वापर वाढल्यास इंधन खर्च कमी होण्यासोबतच प्रदूषणातही घट होईल, असा सरकारचा विश्वास आहे.(PM Modi Fuel Saving Drive)
उत्तर प्रदेशात योगी सरकारचा मोठा निर्णय
पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचा प्रभाव सर्वप्रथम योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये दिसून आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःच्या आणि मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मंत्री आणि आमदारांनी आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
योगी सरकारने राज्यात ‘नो व्हीकल डे’ साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, शक्य तितक्या सरकारी बैठका ऑनलाईन घेण्यावर भर देण्यात येत आहे.(PM Modi Fuel Saving Drive)
मोहन यादव यांनीही त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या १३ वरून थेट ८ पर्यंत कमी केली आहे. त्यांनी राज्यातील मंत्र्यांना कमीत कमी गाड्या वापरण्याचा आणि सादगीपूर्ण जीवनशैली स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. ऊर्जा बचत आणि खर्च नियंत्रणासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.(PM Modi Fuel Saving Drive)
दिल्ली सरकारचा कारपूलिंगवर भर
रेखा गुप्ता यांनीही सरकारी खर्चात कपात करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यांनी स्वतःसह मंत्र्यांना कारपूलिंग करण्याचे निर्देश दिले असून, खासगी वाहनांचा मर्यादित वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीकरांनी मेट्रो आणि बससारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.(PM Modi Fuel Saving Drive)
माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने वर्तमान वैश्विक परिस्थितियों के मद्देनज़र देशवासियों से पेट्रोल-डीजल की बचत करने तथा ऊर्जा संरक्षण को जन आंदोलन बनाने का आह्वान किया है।
माननीय प्रधानमंत्री जी की इस महत्वपूर्ण अपील को आत्मसात करते हुए विभागीय कामकाज हेतु वाहनों की…
राजस्थानमधील भजनलाल शर्मा सरकारनेही या मोहिमेत सहभाग घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली असून, राज्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांमध्ये अनावश्यक वाहन वापर टाळणे आणि सरकारी बैठका शक्य तितक्या व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यावर भर देण्यात आला आहे.(PM Modi Fuel Saving Drive)
जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदींचं आवाहन
काही दिवसांपूर्वी गुजरात आणि हैदराबाद दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी देशवासियांना अनेक महत्त्वाची आवाहनं केली होती. इराण-इस्रायल संघर्षामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा संयमित वापर करण्याचा सल्ला दिला होता. तसेच, एक वर्ष सोन्याची खरेदी टाळा, विदेश दौऱ्यांवरील खर्च कमी करा आणि स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्या, असेही त्यांनी सांगितले होते.(PM Modi Fuel Saving Drive)
कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा परिणाम
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सतत वाढत आहेत. भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंधन बचत आणि खर्च नियंत्रणावर भर दिला आहे.(PM Modi Fuel Saving Drive)
Work From Home आणि Virtual Meetings ला प्रोत्साहन
सरकारने सरकारी विभाग आणि खासगी कंपन्यांना शक्य तिथे Work From Home आणि Virtual Meetings ला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. यामुळे प्रवास कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि सरकारी खर्चातही कपात होईल, असा सरकारचा विश्वास आहे.(PM Modi Fuel Saving Drive)
नैसर्गिक शेतीवर सरकारचा भर
केंद्र सरकार रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. डिझेल पंपाऐवजी सोलार पंपांचा वापर वाढवण्यावरही भर दिला जात आहे. यामुळे ऊर्जा बचत होण्यासोबतच पर्यावरण संरक्षणालाही मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.(PM Modi Fuel Saving Drive)
“सरकारने आदर्श निर्माण करावा” : मोदींचा संदेश
पंतप्रधान मोदींचा स्पष्ट संदेश आहे की, सरकार आणि राज्य प्रशासनाने स्वतः आदर्श निर्माण केला तरच सामान्य नागरिकही या मोहिमेत सहभागी होतील. ऊर्जा बचत, स्वदेशीचा वापर आणि सार्वजनिक संसाधनांचा जबाबदारीने वापर यासाठी ही मोहीम देशव्यापी चळवळ बनवण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.(PM Modi Fuel Saving Drive)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.