मुंबई: (NEET 2026) राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) ने NEET UG 2026 ची मुख्य अखेरची परीक्षा रद्द केली आहे. देशभरात वेगवेगळ्या राज्यांत प्रश्नपत्रिका फुटीचे अहवाल आल्यानंतर ही गंभीर घोषणा करण्यात आली. राजस्थान ते केरळ, बिहार ते महाराष्ट्र–मुंबईपर्यंत गेलेल्या या पेपरफुटीच्या साखळीत आता नाशिक, लातूर, पुणे आणि मुंबई यांचे नेटवर्क स्पष्ट होत आहे. CBI आणि स्थानिक तपास यंत्रणांनी हे रॅकेट उधळून काढण्यासाठी तपास प्रक्रिया आणखी सक्रिय केली आहे. (NEET 2026)
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात सर्वात पहिले नाव नाशिकमधील शुभम खैरनार याचे पुढं आले. CBI ने त्याला अटक केल्यानंतर त्याच्या विरोधात गंभीर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम खैरनार याला NEET प्रश्नपत्रिका कुरियरद्वारे मिळाली होती. त्याने या पेपरसाठी १० लाख रुपये दिले आणि त्याच जुन्या प्रश्नपत्रिका एका उमेदवाराला १५ लाख रुपयांना विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. ओळख न पटण्यासाठी त्याने आपले केस ही कापले होते. वेशभूषा देखील बदलली होती, मात्र तांत्रिक तपासाआधारे पोलिसांनी त्याचा शोध लावला. (NEET 2026)
NEET २०२६ पेपरफुटीत लातूर येथील खासगी कोचिंग क्लास संचालकही शंकेच्या वर्तुळात सापडले आहेत. एका परीक्षार्थीच्या पालकांनी लातूरच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. त्यात असा दावा केला गेला आहे की, या कोचिंग क्लासने NEET UG–२०२६ मुख्य परीक्षेआधी एक मॉक टेस्ट घेतली होती. या मॉक टेस्टमधील ४२ प्रश्न मुख्य परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांशी जवळजवळ सारखे आढळले आहेत. या तक्रारीमुळे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तात्काळ तपास आदेश दिले आहेत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे. या क्लास संचालकांचा पेपरफुटीतील रॅकेटशी जोड कितपत आहे, याची कसून चौकशी करण्यात येत आहे. (NEET 2026)
नाशिकमधील अटकेनंतर पुणे कनेक्शन उघड झाले आहे. माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम खैरनार याच्यासोबत काम करणारा आणखी एक तरुण पुण्यात आढळला आहे. मूळचा अहिल्यानगरचा असलेला हा संशयित व्यक्ती मंगळवारपासून आपला मोबाईल बंद ठेवून पोलिसांपासून लपण्याचा प्रयत्न करत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरात विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. त्याला जर ताब्यात घेतले, तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला थेट CBI च्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लातूर आणि पुणे यांच्यातील हे नेटवर्क NEET २०२६ पेपरफुटीचे जाळे आणखी खोलवर आणि जटिल बनवले असून, या मालिकेत अजून धक्कादायक खुलासे होण्याचा धोका आहे. (NEET 2026)
लातूर-नाशिक-पुणे-मुंबई या कनेक्शनमुळे NEET पेपरफुटी प्रकरण पुन्हा शिक्षणक्षेत्रातला मोठा स्कँडल ठरत आहे. NTA ने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आता पुन्हा नवीन परीक्षा तारीख आणि पेपर तयारीवर भर देण्यात येणार आहे. त्यात देशभरातील विद्यार्थी आणि पालकांना पारदर्शकता आणि निष्पक्षतेची अपेक्षा वाढवली आहे. (NEET 2026)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.