मुंबई : (LPG Crisis India) भारतामधील कोट्यवधी कुटुंबांसाठी मोठी चिंता निर्माण करणारी परिस्थिती उद्भवली आहे. जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या सौदी अरामकोने भारताला होणारा एलपीजी (LPG) गॅस पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशात गॅस टंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(LPG Crisis India)
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीच्या अखेरीस अरामकोच्या ‘जु'आयमाह’ या प्रमुख निर्यात केंद्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीमुळे कंपनीला गॅस निर्यात थांबवण्यास भाग पडले आहे. अरामकोने आपल्या काही ग्राहकांना याबाबत आधीच सूचित केले असून, दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याचे सांगितले आहे.(LPG Crisis India)
विशेष म्हणजे, जरी ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा वाहतुकीसाठी खुली झाली, तरीही पुढील महिन्यात गॅस पुरवठा सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत आहेत. यापूर्वी २६ फेब्रुवारी रोजी कंपनीने कोणतेही सविस्तर कारण न देता काही आठवड्यांसाठी गॅस पुरवठा रद्द करण्याची घोषणा केली होती.(LPG Crisis India)
अरामको ही प्रोपेन आणि ब्युटेन या घटकांची जागतिक स्तरावरील मोठी पुरवठादार आहे. याच घटकांच्या मिश्रणातून एलपीजी गॅस तयार केला जातो. सध्या मध्यपूर्वेतील संघर्ष आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे इतर मार्गांनी होणारा पुरवठा देखील विस्कळीत झाला आहे.(LPG Crisis India)
या दुहेरी फटक्यामुळे भारतात एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवर आणि किंमतींवर होऊ शकतो. परिस्थिती अशीच राहिल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.(LPG Crisis India)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.