US Iran Peace Talks : "बुधवारपर्यंत करार झाला नाही तर इराणवर बॉम्बहल्ला", ट्रम्प यांचा थेट इशारा!

Total Views |
US Iran Peace Talks
 
मुंबई : (US Iran Peace Talks) मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त संस्थाने आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता चर्चेबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, या आठवड्यात इस्लामाबाद येथे होणाऱ्या चर्चेत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वैयक्तिकरित्या सहभागी होऊ शकतात. ते प्रत्यक्ष उपस्थित राहणार की ऑनलाइन, याबाबत अद्याप स्पष्टता नाही, मात्र त्यांच्या सहभागाच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्सुकता वाढली आहे.(US Iran Peace Talks)
 
दोन्ही देशांमधील थंडावलेली चर्चा पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळत असून, ही बैठक बुधवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका पाकिस्तानी सूत्राच्या माहितीनुसार, चर्चेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, याचवेळी ट्रम्प यांनी कठोर इशारा देत म्हटले आहे की, “जर बुधवारपर्यंत करार झाला नाही, तर इराणवर पुन्हा बॉम्बहल्ले होऊ शकतात.” त्यामुळे या चर्चेला ‘डेडलाईन डिप्लोमसी’चे स्वरूप प्राप्त झाले आहे.(US Iran Peace Talks)
 
शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे. अमेरिकेच्या अटींवर नाराज असलेल्या इराणने सुरुवातीला चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, आता भूमिका काहीशी मवाळ करत इराण या चर्चेत सहभागी होण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यानेही सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचे सांगितले आहे.(US Iran Peace Talks)
 
तथापि, अलीकडेच होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणच्या जहाजांवर झालेल्या कारवाईमुळे तणाव पुन्हा वाढला आहे. या घटनेनंतर इराणने चर्चेतून माघार घेण्याचे संकेत दिले होते. तरीही, पाकिस्तानमध्ये नियोजित वेळेनुसार चर्चा होईल, असा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला आहे.(US Iran Peace Talks)
 
चर्चा नेमकी कुठे अडकली, यावरही लक्ष केंद्रीत झाले आहे. ट्रम्प यांना तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक बाजारातील अस्थिरता रोखण्यासाठी करार हवा आहे. त्याचबरोबर, इराणला अण्वस्त्र विकसित करण्याची मुभा देणार नाही, अशी ठाम भूमिका अमेरिकेची आहे. दुसरीकडे, इराण आपल्या अणुकार्यक्रमावर कोणतेही निर्बंध नकोत आणि आर्थिक निर्बंधांमध्ये सवलत हवी, या भूमिकेवर ठाम आहे.(US Iran Peace Talks)
 
होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील धोरणात्मक वर्चस्वाचा वापर करून इराण दबाव निर्माण करत असल्याचेही मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये होणारी संभाव्य बैठक अत्यंत निर्णायक ठरणार असून, त्यातून युद्ध टळणार की संघर्ष अधिक तीव्र होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.(US Iran Peace Talks)
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com