मुंबई : (Tej Pratap Yadav statement) पाटणा येथे राजकीय वातावरणाला एक नवी कलाटणी देणारं वक्तव्य करत तेज प्रताप यादव यांनी काँग्रेस नेतृत्वावर थेट प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, ते “महत्त्वाकांक्षेने चालवलेले आणि गांभीर्याचा अभाव असलेले” नेते असल्याचा आरोप केला. यादव यांच्या मते, राहुल गांधी आपल्या राजकीय मर्यादेपलीकडे जाऊन नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यात त्यांना यश येताना दिसत नाही.(Tej Pratap Yadav statement)
याचवेळी त्यांनी मोठा राजकीय टोला लगावत प्रियंका गांधी वद्रा यांना ‘इंडी’ आघाडीचा संभाव्य चेहरा म्हणून उघड पाठिंबा जाहीर केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रियांका गांधी या इंदिरा गांधी यांच्यासारखे ठाम आणि प्रभावी नेतृत्व देऊ शकतात, जे सध्या विरोधी आघाडीत दिसत नाही.” या तुलनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना अधिकच उधाण आले आहे.(Tej Pratap Yadav statement)
यादव यांनी राहुल गांधींच्या राजकीय शैलीवर टीका करत म्हटले की, “यात्रा काढणे वेगळे आणि संपूर्ण आघाडी चालवणे वेगळे. प्रियांका गांधी ही चालना देणारी शक्ती आहे, पण राहुल गांधींकडून आघाडीचे प्रभावी नेतृत्व अपेक्षित वाटत नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत नेतृत्वाच्या प्रश्नांवरही प्रकाश पडत आहे.(Tej Pratap Yadav statement)
बिहारच्या संदर्भात बोलताना त्यांनी नितीश कुमार यांच्यावरील राहुल गांधींच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. “जे स्वतः दुसऱ्या राज्यात आहेत, ते बिहारच्या राजकारणात इतका हस्तक्षेप का करत आहेत?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.(Tej Pratap Yadav statement)
राजकीय विश्लेषकांच्या मते, तेज प्रताप यादव यांच्या या वक्तव्यामुळे ‘इंडी’ आघाडीत नेतृत्वाचा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांमध्ये “कोण पुढे?” हा प्रश्न आता अधिकच गडद होताना दिसतो.(Tej Pratap Yadav statement)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.