मुंबई : (Maharashtra Budget 2026) महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात शहरी वाहतूक आणि पायाभूत सुविधांना मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ६ मार्च रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. (Maharashtra Budget 2026)
ऐरोली- कटाई नाका उन्नत मार्गाचा तिसरा टप्पा...
ऐरोली ते कटाई नाका या उन्नत मार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम हाती घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या प्रकल्पामुळे ठाणे आणि नवी मुंबई दरम्यानची वाहतूक अधिक जलद आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे. (Maharashtra Budget 2026)
ठाणे ते नवी मुंबई विमानतळ थेट कनेक्टिव्हिटी...
ठाणे ते नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळा दरम्यान उन्नत मार्ग उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा मार्ग तयार झाल्यानंतर विमानतळापर्यंत पोहोचणे अधिक जलद होईल आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशामध्ये वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल. (Maharashtra Budget 2026)
अटल सेतू ते मुंबई-पुणे एक्सप्रेसवे उन्नत मार्ग..,
अटल सेतू ते मुंबई–पुणे एक्सप्रेसवे दरम्यान ११०२ कोटी रुपयांच्या उन्नत मार्गाचे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या मार्गामुळे समुद्री दुव्यापासून थेट पुण्याच्या दिशेने वाहतूक अधिक वेगाने होईल आणि लॉजिस्टिक्स खर्च कमी होण्यास मदत होईल. (Maharashtra Budget 2026)
समृद्धी महामार्गाला मुंबईची थेट जोड...
समृद्धी महामार्गाला मुंबईशी थेट जोडण्यासाठी मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. छेडा नगर ते आनंदनगर आणि आनंदनगर ते साकेत (ठाणे) या उन्नत मार्गांचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच साकेत ते आमने या उन्नत मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. (Maharashtra Budget 2026)