मुंबई : (Maharashtra Budget 2026) देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ६ मार्च रोजी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात शाश्वत शहरी विकासाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शाश्वत शहरी विकास म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखून, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास न करता आणि भावी पिढीच्या गरजा लक्षात घेऊन शहरांचे नियोजन व विकास करणे. राज्यातील झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणाचा विचार करून दीर्घकालीन नियोजनाचा मोठा आराखडा सरकारने मांडला आहे. (Maharashtra Budget 2026)
या आराखड्यानुसार २०४७ पर्यंत महाराष्ट्रातील सुमारे ७० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहणार असून राज्याच्या स्थूल राज्य उत्पन्नात (GSVP) ७५ ते ८० टक्के योगदान शहरांकडून येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा आणि आधुनिक शहरी नियोजनावर विशेष भर देण्यात येणार आहे. (Maharashtra Budget 2026)
राज्यात १० पेक्षा अधिक प्रादेशिक विकास प्राधिकरणे उभारणार...
शहरी विकास अधिक नियोजनबद्ध करण्यासाठी राज्यात १० पेक्षा अधिक सक्षम प्रादेशिक विकास प्राधिकरणे (Regional Development Authorities) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्राधिकरणे मुंबई, पुणे, नागपुर यांसारख्या महानगरांसह आसपासच्या उपनगरांचा विकास आणि नियोजन पाहणार आहेत. (Maharashtra Budget 2026)
याशिवाय ५० पेक्षा जास्त बहुउपयोगी शहरी समूह (Multi-Use Urban Clusters) विकसित करण्यात येणार आहेत. यात निवासी, व्यावसायिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रांचा समावेश असेल. वाहतूक केंद्रित विकास (Transit-Oriented Development) ही संकल्पना राबवली जाईल, ज्यामुळे मेट्रो, बुलेट ट्रेन आणि स्थानिक वाहतूक यांचा एकात्मिक वापर होईल. (Maharashtra Budget 2026)
तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व सेवा १०० टक्के डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जसे की, (Maharashtra Budget 2026)
ऑनलाइन परवाने
कर भरणा
तक्रार निवारण प्रणाली
मुंबई महानगर प्रदेशासाठी ३०० अब्ज डॉलरचे लक्ष्य
मुंबई महानगर प्रदेशची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत १४० अब्ज डॉलरवरून ३०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य सरकारने ठेवले आहे. यासाठी वडाळा येथे १३० एकर जमिनीवर जागतिक दर्जाचा स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब उभारण्यात येणार आहे.ज्यात स्टार्टअप्स, संशोधन केंद्रे आणि टेक पार्कचा समावेश असेल. हा हब मुंबईला ग्लोबल इनोव्हेशन सेंटर म्हणून प्रस्थापित करेल आणि लाखो रोजगार निर्मितीला चालना देईल. (Maharashtra Budget 2026)
बुलेट ट्रेनमुळे ठाणे-विरार परिसराला नवी संधी
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाणे ते तलासरी या भागातील तीन स्थानकांचे काम २०२७ अखेर पूर्ण होणार आहे. या स्थानकांभोवती विशेष विकास आराखडा तयार करण्यात येणार असून विरार-बोईसर आणि ठाणे परिसरात व्यावसायिक संकुले, निवासी वस्त्या आणि लॉजिस्टिक्स हबचा विकास होईल, ज्यामुळे या भागांना नवीन आर्थिक केंद्र म्हणून चढती घाटाची संधी मिळेल. (Maharashtra Budget 2026)
‘तिसरी मुंबई ३.०’ प्रकल्प...
अटल सेतू परिसरात ‘तिसरी मुंबई ३.०’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये कर्नाळा, साई, चिरणेर, रायगड, पेठ तसेच नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट नोड्स म्हणून विकसित केले जाणार आहेत. हे शहर हरित ऊर्जा, स्मार्ट सिटी सुविधा आणि पर्यावरणपूरक शहरी नियोजनासह उभारले जाईल. यामुळे मुंबई मधील लोकसंख्येचा ताण कमी होईल आणि नवीन आर्थिक केंद्र निर्माण होईल. (Maharashtra Budget 2026)
♦️मुंबई महानगर प्रदेश - विकासाचे केंद्र
➡️ मुंबई मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 140 अब्ज डॉलर वरून 300 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ➡️ वडाळा इथं 130 एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब स्थापन करणार ➡️ मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील ठाणे ते… pic.twitter.com/7vEL0B4NLF
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.