Wadala to Gateway of India Metro: ‘वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया थेट मेट्रो! ’२३,४८७ कोटींचा भुयारी प्रकल्प, कशी असेल मार्गिका?

06 Mar 2026 19:16:08
 
Wadala to Gateway of India Metro
 
मुंबई : (Wadala to Gateway of India Metro) मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुंबईकरांसाठी मोठी घोषणा केली. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई मेट्रो लाइन ११ उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत गेटवे ऑफ इंडिया ते वडाळा दरम्यान पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. सुमारे २३,४८७ कोटी रुपये खर्चाच्या या १७ किमी लांबीच्या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई आणि मध्य उपनगरांमधील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. (Wadala to Gateway of India Metro)
 
मुंबईसह तीन शहरांत मेट्रोचा विस्तार
 
अर्थसंकल्पीय भाषणात फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये एकूण ४९० किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांचे काम सुरू आहे. त्यापैकी १७४ किमी मार्ग सध्या वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. आगामी वर्षात आणखी ५० किमी मार्गिका सुरू करण्याचे नियोजन आहे. तर २०२९ पर्यंत १६५ किमी लांबीच्या नवीन मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. (Wadala to Gateway of India Metro)
 
हेही वाचा: maharashtra budget 2026: महायुती सरकारने शब्द पाळला; राज्यातील शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 
 
कुठून कुठे धावणार मेट्रो? 
 
प्रस्तावित मेट्रो लाइन ११ ची सुरुवात वडाळ्यातील अनिक डेपो येथून होणार आहे. या मार्गिकेवर एकूण १४ मेट्रो स्थानकांचा प्रस्ताव असून त्यापैकी १३ स्थानके भूमिगत असतील. या मेट्रोचा विस्तार पुढील महत्त्वाच्या भागांपर्यंत करण्याची योजना आहे... (Wadala to Gateway of India Metro)
 
धारावी पुनर्विकास प्रकल्प परिसर
 
वांद्रे उपनगरी रेल्वे स्थानक
 
वांद्रे टर्मिनस
 
बहुस्तरीय डेपोची योजना
 
या प्रकल्पात बहुस्तरीय संरचना उभारण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या स्तरावर मेट्रो कार डेपो, त्यावरील टप्प्यात बेस्ट बस डेपो आणि सर्वात वरच्या स्तरावर नवीन विकास प्रकल्प अशी योजना आखण्यात आली आहे. ही मार्गिका मुंबई मेट्रो लाइन ३ (अक्वा लाइन) च्या धर्तीवर विकसित केली जाणार आहे. (Wadala to Gateway of India Metro)
 
 
Powered By Sangraha 9.0