Ajit Pawar Plane Crash:“कोणाला वाचवण्याचा प्रयत्न?”; रोहित पवारांचा गंभीर आरोप

04 Mar 2026 18:12:22

 
Ajit Pawar Plane Crash

मुंबई : (Ajit Pawar Plane Crash) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर तपास अहवालावरून नवे वाद निर्माण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (DGCA)च्या आणि AAIB च्या प्राथमिक अहवालानंतर आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. (Ajit Pawar Plane Crash)

रोहित पवार म्हणाले, “मी DGCA किंवा VSR कंपनीविरोधात नाही; मात्र या प्रकरणात कोणीतरी कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका निर्माण होते. अहवालात नमूद केलेल्या काही मूलभूत बाबींमध्येच तफावत दिसते.” (Ajit Pawar Plane Crash)

विमान कोसळतानाचा व्हिडिओ दाखवत पवार यांनी सांगितले की, “व्हिडिओनुसार विमान डावीकडे झुकून कोसळले; मात्र अहवालातील निरीक्षण वेगळे आहे. ही बेसिक गोष्ट चुकली कशी?” (Ajit Pawar Plane Crash)

हेही वाचा: Rajya Sabha Election 2026: १६ मार्चला ३७ राज्यसभा जागांसाठी मतदान; महाराष्ट्रात शरद पवारांवरून राजकीय सस्पेन्स?

 

ते पुढे म्हणाले, “गोळी कुठे लागली हे जसं महत्त्वाचं असतं, तसंच इथे मूलभूत निरीक्षणच चुकीचं असल्याचं दिसतं. झाडांना धडकून विमान कोसळल्याचा उल्लेख आहे; प्रत्यक्षात तिथे फक्त झुडुपे आहेत आणि विमान त्यांना धडकल्याचे पुरावे दिसत नाहीत.” रोहित पवार यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला की, AAIB च्या अहवालात तपास पथकातील अधिकाऱ्यांची नावे नमूद केलेली नाहीत. “२०२३ मधील मुंबईतील लेअरजेट अपघातात तपास अधिकाऱ्यांची नावे होती. मग या प्रकरणात का नाहीत?” असा सवाल त्यांनी केला. (Ajit Pawar Plane Crash)

पवार यांच्या मते, बारामती विमानतळावर लँडिंगवेळी दृश्यमानता केवळ ३ किमी होती, तर VFR नियमानुसार किमान ५ किमी आवश्यक आहे. “व्हिजिबिलिटी कमी असताना उड्डाण करू नये, असा त्यागी समितीचा स्पष्ट नियम आहे. मग उड्डाण आणि लँडिंगला परवानगी कशी देण्यात आली?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Ajit Pawar Plane Crash)

पवार म्हणाले, “ब्लॅक बॉक्सचे फोटो प्रसिद्ध झाले नाहीत. ९०-९५% इंधन का भरले होते? विमान हैदराबादला जाणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला नव्हती. काही बाबतीत कागदपत्रांची हेराफेरी झाली का?”AAIB च्या प्राथमिक अहवालानुसार, फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) मधील डेटा यशस्वीरीत्या डाउनलोड झाला आहे; मात्र कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) चा डेटा अमेरिकन तांत्रिक मानकांनुसार पुनर्प्राप्त केला जाणार आहे. दोन्ही पायलट्सच्या मद्यपान चाचण्या निगेटिव्ह आल्या असल्याचेही अहवालात नमूद आहे. (Ajit Pawar Plane Crash)

हे वाचलात का?: संजय राऊत यांची कल्पकशक्ती सुमार; भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला 

 

प्राथमिक अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

लँडिंगवेळी दृश्यमानता ३ किमी

बारामती हे अनियंत्रित एअरफिल्ड; रनवे मार्किंग फिकट

पहिल्या प्रयत्नात ‘गो-अराउंड’, दुसऱ्या प्रयत्नात लँडिंग

अंतिम क्षणी कॉकपिटमधूनOh S**t…” असा आवाज

विमान रनवेच्या डाव्या बाजूस सुमारे ५० मीटरवर कोसळले

रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणात गुन्हेगारी कोनातून तपास करण्याची मागणी केली आहे. “नियम असताना ते पाळले का नाहीत? तपासात पारदर्शकता का नाही?” असे सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. (Ajit Pawar Plane Crash)

 
 
Powered By Sangraha 9.0