बोरिवली नॅशनल पार्कमध्ये बिबट्याची शिकार करुन कातडी विकायला डहाणूला; काय आहे प्रकरण?

    30-Mar-2026   
Total Views |
leopard poached in sgnp



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
साधारण तीन महिन्यांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बिबट्याची शिकार करून त्याची कातडी विकणार्या शिकार्यांच्या डहाणू वन विभागाने रविवार दि. २९ मार्च रोजी मुसक्या आवळल्या (leopard poached in sgnp). येऊर वनपरिक्षेत्रातील काशीगाव येथून बिबट्याची शिकार केल्याची कबुली शिकार्यांनी दिली आहे (leopard poached in sgnp). काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय उद्यानातील नागला वनपरिक्षेत्रातून बिबट्याची शिकार झाल्याचे प्रकरण समोर आलेले असताना, आता येऊर वनपरिक्षेत्रात बिबट्याची शिकार घडली आहे (leopard poached in sgnp). त्यामुळे राष्ट्रीय उद्यानात बिबट शिकारीचे सत्र सुरू असून प्रशासनाने वन्यजीव आणि वनरक्षणाला हरताळ फासल्याचे दिसत आहे. (leopard poached in sgnp)
 
डहाणू वन विभागातील मांडवीचे उपविभागीय वन अधिकारी अमित भोसले यांना दोन इसम बिबट्याची कातडी विक्री करण्याकरिता ग्राहक शोधत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून अमित भोसले यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी भाताणे विजय बारब्दे आणि वनपाल नितीन खुळपे यांनी स्वतः ग्राहक असल्याचा बनाव करून शिकार्यांशी संपर्क केला. तसेच रविवारी त्यांना मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खानिवडे येथील टोल नाक्याजवळ बोलविले. त्याठिकाणी आलेल्या दोन इसमांकडे एका गोणीत बिबट्याचे हळद लावून संरक्षित केलेले कातडे असल्याचे दिसून आले. कातडे अस्सल असल्याचे दिसून आल्यावरून जवळच दडून बसवलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या इसमांपैकी एक इसम मिरा भाईंदर येथील काशीगाव येथील वरठापाडा येथे राहणारा विशाल वामन वरठा असून दुसरा इसम जुचंद्र येथे राहणारा मयूर प्रमोद म्हात्रे आहे.
 
 
या दोघांचीही चौकशी केली असता त्यामधील विशाल वरठा याने इतर साथीदार यांच्यासोबत मिळून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील संरक्षित क्षेत्रात अंदाजे तीन महिन्यांपूर्वी बिबट्याची शिकार केल्याची कबुली दिली. तसेच बिबट्याची कातडी काढली असून इतर अवयव हे साथीदारांकडे असल्याचे सांगितले. यावरून राष्ट्रीय उद्यानात बिबट शिकारीचे सत्र सुरू असून शिकार्यांचा सुळसुळाट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.