अकुशल पदे ई - निविदा प्रकरणी उपोषण मागे

26 Mar 2026 13:32:14
Aditi Tatkare
 
मुंबई :  (Aditi Tatkare) महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या अधिपत्याखालील अकुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासाठी काढण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या स्टार्टअप व इतर मागण्यांसंदर्भात शिवाजी गावडे, भगवान कंधारे व इतर यांनी आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण सुरू केले होते.
 
सदर प्रकरणी दिनांक २४ मार्च ३०२६ रोजी मंत्रालयात अदिती तटकरे,मंत्री, महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली उपोषणकर्त्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
 
हेही वाचा : एमपीआयडी प्रकरणात जलद कारवाईसाठी कायद्यात बदल करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
महिला व बाल विकास विभागाचे सचिव तसेच महिला व बाल विकास आयुक्त हे सध्या परराज्यात निवडणूक कर्तव्यावर असल्यामुळे, संबंधित विषयावर एप्रिल २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यात सविस्तर बैठक आयोजित करण्यात येईल.
सदर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तात्काळ मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0